INDvsWI : सराव सामन्यासाठी विंडीजने धाडलं एक्स्पर्ट्सना बोलावणं

वृत्तसंस्था
Saturday, 17 August 2019

भारत आणि वेस्ट इंडिया यांच्यात होणाऱ्या तीन दिवसांच्या सराव कसोटी सामन्यासाठी विंडीजने 14 खेळाडूंचा संघ जाहीर केला आहे. यामध्ये त्यांनी डॅरेन ब्राव्हो आणि जॉन कॅम्प्बेल यांनी संधी दिली आहे. या संघाचे नेतृत्व यष्टिरक्षक जॅहमर हॅमिल्टन करणार आहे.

गयाना : भारत आणि वेस्ट इंडिया यांच्यात होणाऱ्या तीन दिवसांच्या सराव कसोटी सामन्यासाठी विंडीजने 14 खेळाडूंचा संघ जाहीर केला आहे. यामध्ये त्यांनी डॅरेन ब्राव्हो आणि जॉन कॅम्प्बेल यांनी संधी दिली आहे. या संघाचे नेतृत्व यष्टिरक्षक जॅहमर हॅमिल्टन करणार आहे.

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात 22 ऑगस्टपासून कसोटी मालिका सुरु होणार आहे. पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी 17 ऑगस्टपासून दोन्ही संघात तीन दिवसांचा सराव सामना खेळविला जाणार आहे. मात्र, भारताचा कर्णधार विराट कोहली दुखापतीमुळे या सराव सामन्यातून माघार घेणार आहे. 

वेस्ट इंडिजचा संघ : जॅहमर हॅमिल्टन ( कर्णधार), डॅरेन ब्राव्हो, जॉन कॅम्प्बेल, जॉनथन कार्टर, अकिम फ्रेजर, किओन हार्डिंग, काव्हेम हॉड्ज, ब्रँडन किंग, जेसन मोहम्मद, मार्क्युनो मिंडली, खॅरी पिएर, रोव्हमन पॉवेल, रोमारिओ शेफर्ड, जेरेमी सोलोझानो.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: West Indies Name Darren Bravo and John Campbell For Practice Match Against India