WI vs IND 1st T20 : रोहित - कार्तिक चमकले; भारताची विजय सलामी

West Indies vs India 1st T20I  Live Cricket Score Highlights
West Indies vs India 1st T20I Live Cricket Score Highlightsesakal

West Indies vs India 1st T20I : भारताने वेस्ट इंडीजचा पहिल्या टी 20 सामन्यात 68 धावांनी पराभव करत मालिकेत 1 - 0 अशी आघाडी घेतली. भारताकडून कर्णधार रोहित शर्माने 64 तर दिनेश कार्तिकने नाबाद 41 धावा करत भारताला 190 धावा उभारून दिल्या. त्यानंतर अर्शदीप सिंग, रवी बिश्नोई आणि रविचंद्रन अश्विनने प्रत्येकी 2 विकेट घेत विंडीजला 20 षटकात 8 फलंदाजांच्या मोबदल्यात 122 धावात रोखले.

भारताने सामना 68 धावांनी जिंकला 

86-7 : विंडीज पराभवाच्या छायेत 

रविचंद्रन अश्विन आणि रवी बिश्नोईने वेस्ट इंडीजच्या मधल्या फळीला खिंडार पाडले. अश्विनने हेटमायरला 14 तर बिश्नोईने ओडेन स्मिथला शुन्यावर बाद केले.

82-5 : विंडीजचा निम्मा संघ माघारी 

रविचंद्रन अश्विनने निकोलस पूरनला 18 तर रवी बिश्नोईने रोव्हमन पॉवेलला 14 धावांवर बाद करत विंडीजचा निम्मा संघ माघारी धाडला.

42-3 : शमरह ब्रुक्सला भुवीने केले बाद

भारताने वेस्ट इंडीजला ठराविक अंतराने धक्के देण्याचे सुरूच ठवले. भुवनेश्वर कुमारने शमहर ब्रुक्सला 20 धावांवर बाद करत विंडीजला तिसरा धक्का दिला.

27-2 : रविंद्र जडेजाने होल्डरची केली शिकार

रविंद्र जडेजाने जेसन होल्डरला शुन्यावर बाद करत वेस्ट इंडीजचा दुसरा फलंदाज पॅव्हेलियनमध्ये धाडला.

 अर्शदीपने दिला विंडीजला पहिला धक्का

अर्शदीप सिंगने कायल मायेर्सला 15 धावांवर बाद करत वेस्ट इंडीजला पहिला धक्का दिला.

190/6 (20) : दिनेश कार्तिकचा कॅमियो

रोहित शर्मा, रविंद्र जडेजा बाद झाल्यानंतर दिनेश कार्तिकने स्लॉग ओव्हरमध्ये दमदार फलंदाजी करत संघाला 190 धावांपर्यंत पोहचवले.

138-6 : रविंद्र जडेजा 16 धावा करून बाद 

रोहित बाद झाल्यानंतर रविंद्र जडेजाही 16 धावा करून बाद झाला.

127-5 : रोहित शर्मा अर्धशतकानंतर बाद 

भारताचा कर्णधार रोहित शर्माने झुंजार अर्धशतक ठोकले. मात्र त्याला होल्डरने 64 धावांवर बाद केले. रोहितने 44 चेंडूत 7 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 64 धावा केल्या.

 रोहित शर्माचे झुंजार अर्धशतक

भारताचा कर्णधार रोहित शर्माने झुंजार अर्धशतकी खेळी करत भारताला शतकी मजल मारून दिली.

102-4 : हार्दिक पांड्या स्वस्तात परतला

एका बाजूने रोहित शर्मा एकाकी खिंड लढवत असताना दुसऱ्या बाजूने भारताचे एका पाठोपाठ एक फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतत होते. पंत बाद झाल्यानंतर आलेला हार्दिक पांड्या देखील 1 धावेची भर घालून परतला.

88-3 : पंत 14 धावांची भर घालून परतला

कीमो पॉलने ऋषभ पंतला 14 धावांवर बाद करत भारताला 10 व्या षटकात तिसरा धक्का दिला.

45-2 : श्रेयस अय्यर शुन्यावर बाद 

ओबेड मॅकॉयने श्रेयस अय्यरला शुन्यावर बाद करत भारताला दुसरा धक्का दिला.

44-1 : भारताला पहिला धक्का

अकील हुसैनने भारताला पहिला धक्का दिला. त्याने 16 चेंडूत 24 धावा करणाऱ्या सूर्यकुमार यादवला बाद केले.

सूर्यकुमार यादव सलामीला

भारतीय संघाने पहिल्या टी 20 सामन्यात धक्कातंत्राचा वापर करत सलामीला रोहित शर्मासोबत ऋषभ पंतला न पाठवता सूर्यकुमार यादवला पाठवण्यात आले.

वेस्ट इंडीजने  नाणेफेक जिंकली

पहिल्या टी 20 सामन्यात वेस्ट इंडीजने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com