WI vs IND 1st Test : खेळपट्टीची भारताला साथ तरी समुद्रामुळे सामन्यावर येणार बालंट; कसं असेल पाचही दिवस हवामान?

West Indies Vs India 1st Test
West Indies Vs India 1st Testesakal
Updated on

West Indies Vs India 1st Test : भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील पहिला कसोटी सामना हा उद्या (दि. 12) विंडसर पार्क येथे खेळवला जाणार आहे. भारत विंडीजमध्ये दोनच कसोटी सामन्यांची मालिका खेळणार असल्यामुळे पहिल्या कसोटीपासूनच टीम इंडियाला चांगला खेळ करावा लागेल. विशेष म्हणजे विंडसरवर तब्बल 6 वर्षांनी पहिल्यांदाच कसोटी सामना होणार आहे.

भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात 2011 मध्ये इथं पहिला कसोटी सामना खेळवला गेला होता. हा सामना अनिर्णित राहिला होता. त्यानंतर या मैदानावर झालेल्या सर्व सामन्यांचे निकाल लागले होते.

West Indies Vs India 1st Test
Shafali Verma : W, W, W... शफाली वर्माचा शेवटच्या षटकात धमाका, फक्त 95 धावा करूनही भारत जिंकला

कशी असते विंडसरची खेळपट्टी?

विंडसर पार्क जरी कॅरेबियन देश असला तरी येथील खेळपट्टी ही फिरकी गोलंदाजांना मदत करणारी असते. वेस्ट इंडीजचा ऑफ स्पिनर शेन शिलिंगफोर्डने या मैदानावर दोन कसोटीत 20 विकेट्स घेतल्या आहेत. या खेळपट्टीवर सर्वाधिक विकेट घेणाऱ्यांच्या यादीत देवेंद्र बिशू आणि तिसऱ्या क्रमांकावर नॅथन लॉयन आहे. (West Indies Vs India 1st Test Pitch Report)

या आकडेवारीवरून विंडसरची खेळपट्टी ही फिरकीला साथ देणारी असते हे स्पष्ट होते. त्यामुळे पहिल्या कसोटीत भारताचे आर. अश्विन, रविंद्र जडेजा आणि अक्षर पटेल हे खेळताना दिसतील अशी आशा आहे. या मैदानावर आतपर्यंत कसोटीत 400 धावा झालेल्या नाहीत. त्यामुळे फलंदाजाकडून मोठी खेळी झालेली क्वचितच पहायला मिळेल.

West Indies Vs India 1st Test
Lord Hanuman Mascot : थायलंडमध्ये होणाऱ्या एशियन अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपसाठी हनुमान अधिकृत शुभंकर

विंडसरचं हवामान कसं असेल?

डॉमिनिका हे चारही बाजूंनी समुद्राने वेढलेले आहे. त्यामुळे इथे चांगलाच पाऊस पडत असतो. भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील पहिल्या कसोटीतील पाचही दिवस पाऊस पडले असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सामन्याच्या शेवटच्या दिवशी सर्वात जास्त पाऊस पडण्याची देखील शक्यता आहे. (West Indies Vs India 1st Test Weather Update)

सामन्यादरम्यान, दिवसाचं तापमान हे 27 ते 30 डिग्री सेल्सियस असणार आहे. कसोटी क्रिकेटसाठी हे उत्तम तापमान मानलं जातं. मात्र सामन्यात सतत पावसाचा व्यत्यय आला तर चाहत्यांची निराशा होऊ शकते.

भारताचा कसोटी संघ :

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, यशस्वी जैसवाल, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), केएस भरत (विकेटकिपर), इशान किशन (विकेटकिपर), आर. अश्विन, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जयदेव उनाडकट, नवदीप सैनी.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.