WI vs IND : भारत अमेरिकेत खेळणार मात्र रोहितचं काय होणार? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

West Indies Vs India 4th T20I In Florida Captain Rohit Sharma Fitness Update

WI vs IND : भारत अमेरिकेत खेळणार मात्र रोहितचं काय होणार?

नवी दिल्ली : भारत आणि वेस्ट इंडीज (West Indies Vs India 4th T20I) यांच्यातील चौथा आणि पाचवा टी 20 सामना अमेरिकेतील फ्लोरिडा येथे होणार आहे. भारत सध्या मालिकेत 2 - 1 असा आघाडीवर आहे. मालिकेतील चौथा सामना जिंकून भारता मालिकेत 3 -1 अशी विजयी आघाडी घेण्याच्या तयारीत असेल. मात्र तिसऱ्या सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्माला (Rohit Sharma Fitness) फलंदाजी करताना दुखापत झाली होती. तो 11 धावांवर असताना त्याच्या पाठीचा स्नायू दुखावला. त्याला मैदान देखील सोडावे लागले. तो चौथ्या सामन्यात खेळणार की नाही याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. मात्र तीन दिवसाच्या विश्रांतीनंतर तो आता खेळण्यासाठी फिट झाला आहे.

हेही वाचा: दिनेश कार्तिकमुळे रोहित शर्मा झाला ओपनर; माजी फिल्डिंग कोचचा दावा

वेस्ट इंडीज विरूद्धच्या चौथ्या सामन्यात भारताच्या मधल्या फळीतील फलंदाज श्रेय अय्यर (Shreyas Iyer) वर सर्वांची नजर असणार आहे. श्रेयस अय्यरला टी 20 सामन्यात फारशी चांगली कामगिरी करता आलेली नाही. दुसऱ्या बाजूला दीपक हुड्डाने संधीचे सोने करत मध्यल्य फळीतील आपली उपयुक्तता सिद्ध करून दाखवली आहे.

दरम्यान, आशिया कप 2022 साठी केएल राहुल आणि विराट कोहली संघात परतण्याची शक्यता आहे. त्यामुळे श्रेयस अय्यरला संघाच्या बाहेर बसावे लागले. श्रेयस अय्यरने गेल्या तीन सामन्यात 0,11 आणि 24 धावा केल्या आहेत. त्याला वेगवान गोलंदाजांचा अखूड टप्प्याचा चेंडू खेळताना अडचणी येत आहेत.

हेही वाचा: दारू सोडून वडिलांनी मुलाला घडवलं; श्रीशंकरच्या रुपेरी कामगिरीमागचा संघर्ष

भारतीय संघ :

रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, दीपक हुड्डा, हार्दिक पांड्या, ऋषभ पंत, इशान किशन, दिनेश कार्तिक, संजू सॅमसन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह, आवेश खान, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल.

Web Title: West Indies Vs India 4th T20i In Florida Captain Rohit Sharma Fitness Update

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..