दारू सोडून वडिलांनी मुलाला घडवलं; श्रीशंकरच्या रुपेरी कामगिरीमागचा संघर्ष

Story Of Murli Sreeshankar Who Won Medal In Long Jump
Story Of Murli Sreeshankar Who Won Medal In Long Jumpesakal

कॉमनवेल्थ लॉन्ग जंप इव्हेंटच्या अंतिम सामन्यात भारताचा लांब उडीपटू एम श्रीशंकरनं (Murli Shreeshankar) रौप्यपदक जिंकून बर्मिंगहॅममध्ये तिरंगा फडकावलाय. केरळमधील पलक्कड येथील २३ वर्षीय मुरली श्रीशंकर हा लांब उडीत राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पदक जिंकणारा पहिला पुरुष भारतीय खेळाडू ठरला आहे. या स्पर्धेत श्रीशंकर हा सहावा होता. पण फक्त एकाच दमदार उडीच्या जोरावर त्याने दुसरा क्रमांक गाठला आणि रौप्यपदकाला गवसणी घातली. (Story Of Murli Sreeshankar Who Won Medal In Long Jump For India In Cwg 2022)

एप्रिलमध्ये फेडरेशन कप फायनलमध्ये ८.३६ मीटर अंतराहसह राष्ट्रीय रेकॉर्ड केले होते. यासोबतच शंकरने 2022 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतही स्थान मिळविले. जागतिक ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप 2022 च्या लांब उडीत अंतिम फेरीत पोहोचणारा तो पहिला भारतीय पुरुष आहे. फेडरेशन कपमध्ये आश्चर्यकारक कामगिरी करण्याव्यतिरिक्त, श्रीशंकरने ग्रीसमध्ये 8.31 मीटर उडी मारली होती.

Story Of Murli Sreeshankar Who Won Medal In Long Jump
वयाच्या पाचव्या वर्षी गोल्डन बॉय सुधीर ठरला होता पोलिओचा बळी, जाणून घ्या Inside Story

श्रीशंकर २०१८ मध्येच राष्ट्रकुल स्पर्धेत भाग घेणार होता. मात्र, जुलाबच्या समस्येमुळे त्याला प्रवेश करता आला नाही. आजारपणामुळं त्याला स्पर्ध्येच्या १० दिवस आधी आपले नाव मागे घ्यावे लागे. त्यानंतर २०१८ मध्येच पटिलायामध्ये फेटरेशन कप सीनिअर एथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये ७.९९ मीटर उडी ठोकत सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले होते. याचवर्षी त्याने ८.२० मीटर लांब उडी ठोकत राष्ट्रीय रेकॉर्ड तोडले. या स्पर्धेतदेखील त्याने सुवर्ण पदकावर कब्जा केला.

Story Of Murli Sreeshankar Who Won Medal In Long Jump
CWG2022 :लांब उडीत भारताच्या मुरली शंकरने रचला इतिहास, जिंकले रौप्यपदक

वडीलदेखील होते एथलीट

श्रीशंकरचे वडील एस. मुरली हेच त्याचे कोच होते. श्रीशंकरच्या म्हणण्यानुसार, की त्यांचे वडील त्यांच्यापेक्षा त्याच्यामधील खेळाला चांगले समजतात. श्रीशंकरचे वडील माजी तिहेरी उडीपटू आणि दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक विजेते होते. 1992 च्या आशियाई ज्युनियर ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये त्याची आई के.एस. बिजीमोलने 800 मीटर शर्यतीत रौप्य पदक जिंकले.

श्रीशंकरचे वडील मुरली यांना एकेकाळी दारूचे व्यसन होते. परंतु मुलाच्या खेळावर लक्ष केंद्रित करण्यासाठी त्यांनी त्यापासून स्वतःला दूर केले. टोकियो ऑलिम्पिकमध्ये श्रीशंकरच्या अपयशानंतर मुरलीनेच आपल्या मुलाची काळजी घेतली. त्यावेळी श्रीशंकर खूप दडपणाखाली गेला होता. त्याने खेळापेक्षा आपले लक्ष अभ्यासाकडे वळवण्याचे ठरवले. मात्र, त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहीले. आणि आज श्रीशंकर आपले नाव इतिहासात नोंदवले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com