WI vs IND 5th T20I : किंग - पूरनची शतकी भागीदारी, भारताने मालिका गमावली

West Indies vs India 5th T20I
West Indies vs India 5th T20Iesakal

West Indies vs India 5th T20I : वेस्ट इंडीजने पाचव्या आणि निर्णायक टी 20 सामन्यात भारताचा 8 विकेट्सनी पराभव करत मालिका 3 - 2 अशी जिंकली. भारताने ठेवलेले 166 धावांचे आव्हान विंडीजने षटकात पार केले. विंडीजकडून सलामीवीर ब्रँडन किंगने आक्रमक फलंदाजी करत नाबाद 85 धावा केल्या. त्याने निकोलस पूरन सोबत दुसऱ्या विकेटसाठी 107 धावांची शतकी भागीदारी रचली. पूरनने 47 धावांची खेळी करत त्याला चांगली साथ दिली.

भारताने वेस्ट इंडीजविरूद्धच्या पाचव्या आणि निर्णयाक सामन्यात नाणेफेक जिंकून 20 षटकात 9 बाद 165 धावा केल्या. भारताकडून उपकर्णधार सूर्यकुमार यादवने 45 चेंडूत 61 धावांची खेळी करत भारताच्या डावाला आकार दिला.

119-2 : तिलक वर्माने दिला भारताला दिलासा 

निकोलस पूरन आणि ब्रँडन किंग यांनी दुसऱ्या विकेटसाठी 107 धावांची भागीदारी रचत विंडीजला विजयी मार्गावर नेले होते. त्यात पावसामुळे अनेकवेळा सामना थांबवावा लागला होता. मात्र अखेर भारताला ही जोडी फोडण्यात यश आले.

आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील दुसऱ्याच चेंडूवर तिलक वर्माने निकोसल पूरनला 47 धावांवर बाद केले.

83-1 (8.3 Ov) : किंग अन् पूरननं केली धुलाई 

वेस्ट इंडीजने 12 धावांवर एक विकेट गमावल्यानंतर भारतीय गोलंदाजांची यथेच्छ धुलाई केली. निकोलस पूरन आणि ब्रँडन किंग यांनी विंडीजला 9 षटकात 86 धावांपर्यंत पोहचवले.

WI 33/1 (3.2) : निकोलस पूरनची आक्रमक फलंदाजी 

अर्शदीप सिंगने दुसऱ्याच षटकात कायल मेयर्सला बाद करत भारताला पहिले यश मिळवून दिले. मात्र या विकेटचा आनंद फार काळ टिकला नाही. निकोलस पूरनने आल्या आल्या आक्रमक फलंदाजी करत विंडीजला 3 षटकात 30 धावांच्या पार पोहचवले.

भारताचे वेस्ट इंडीजसमोर 165 धावांचे आव्हान 

रोमारियो शेफर्डने भारताच्या मधल्या फळीला खिंडार पाडले खरे मात्र सूर्यकुमार यादवने 45 चेंडूत 61 धावांची खेळी करत भारताला 165 धावांपर्यंत पोहचण्यात मदत केली.

121-4 (15.5 Ov) : सूर्याचे अर्धशतक मात्र पावसामुळे खेळ थांबला

सूर्यकुमार यादवने भारताचा डाव सावरत 39 चेंडूत नाबाद 53 धावांची खेळी केली. त्याने भारताला 15.5 षटकात 121 धावांपर्यंत पोहचवले. मात्र त्यानंतर पावसाला सुरूवात झाली अन् खेळ थांबवावा लागला.

 87-4  : संजू पुन्हा फेल, विंडीजने दिले धक्के 

तिलक वर्मा सूर्यकुमार यादव सोबत तिसऱ्या विकेटसाठी 49 धावांची भागीदारी रचून बाद झाला. त्याला रोस्टन चेसने 27 धावांवर बाद केले. यानंतर आलेल्या संजू सॅमसनला मोठी खेळी करण्यात यश आले नाही. तो 13 धावांची भर घारून माघारी परतला.

53-2 (6.2 Ov) :  सूर्या - तिलकचा धडाका 

भारताने 17 धावांवर आपले दोन्ही सलामीवीर गमावल्यानंतर सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांनी भारताचा नुसता डाव सावरला नाही तर आक्रमक फलंदाजी करत भारताला पॉवर प्लेमध्येच अर्धशतकी मजल मारून दिली.

17-2 : भारताला दोन धक्के 

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताला विंडीजच्या अकील हुसैनने पाठोपाठ दोन धक्के दिले. त्याने पहिल्याच षटकात यशस्वी जैसवालला बाद केलं. त्यानंतर पुढच्याच षटकात अकीलने 9 धावा करणाऱ्या शुभमन गिलला बाद केले.

भारताने नाणेफेक जिंकली

भारताने पाचव्या टी 20 सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने आपल्या संघात कोणताही बदल केलेला नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com