
वेस्ट इंडिजचे वेगवान गोलंदाज टिनो बेस्ट यांनी लिहिलेल्या आत्मचरित्रात खळबळजनक असे दावे केले आहेत. त्यांचे आत्मचरित्र प्रकाशित झाल्यानंतर क्रिकेट विश्वात खळबळ उडाली आहे. वेस्ट इंडिजकडून २५ कसोटी सामने खेळलेल्या टिनो बेस्ट यांनी ५७ विकेट घेतल्या. तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये २६ सामने खेळताना ३४ विकेट घेतल्या होत्या. बार्बाडोसमध्ये त्यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पाच सामन्यात १७ विकेट घेत जबरदस्त कामगिरी केली होती.