esakal | World Cup 2019 : मँचेस्टरमध्ये काय आहे आज पावसाचा अंदाज
sakal

बोलून बातमी शोधा

World Cup 2019 : मँचेस्टरमध्ये काय आहे आज पावसाचा अंदाज

- न्यूझीलंडचा डाव ४६.१ षटकापासून सुरु होणार
- पूर्ण ५० षटकांचा खेळ होण्यास प्राधान्य.
-न्यूझीलंडचा डाव झाल्यास आणि त्यानंतर पाऊस आल्यास डकवर्थ लुईस नियमाप्रमाणे षटके कमी करून नवे आव्हान तयार होईल.
-कमीत कमी भारताच्या डावाची २० षटके खेळवण्याचा प्रयत्न, तसे न झाल्यास भारत अंतिम फेरीत.

World Cup 2019 : मँचेस्टरमध्ये काय आहे आज पावसाचा अंदाज

sakal_logo
By
वृत्तसंस्था

वर्ल्ड कप 2019 : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील उपांत्य लढत राखीव दिवशी मंगळवारच्या अर्धवट स्थितीत सुरु होईल. सामना पूर्ण 50 षटकांचा होण्यासाठी किमान साडे चार तासांचा पावसांचा ब्रेक आवश्‍यक आहे, तर ट्‌वेंटी20 साठी दोन तास. या परिस्थिती मॅंचेस्टरचे हवामान पाहिल्यास लढत सुरु होण्याच्या सुमारास ढगाळ वातावरण असेल, पण अर्ध्या तासात (भारतीय वेळेनुसार 4 वाजता) पाऊस होईल, असा ऍक्‍यूवेदरचा अंदाज आहे. त्या

नंतर किमान चार तास ढगाळ हवा असेल आणि पुन्हा एक तास पावसाचा व्यत्यय असेल. अर्थात मंगळवारीही काहीसे हेच हवामान असताना पहिले सत्र संपण्यापूर्वीच सुरु झालेला पाऊस थांबला नाही. ब्रिटनमधील हवामान सध्या अचानक बदलत आहे, याकडे तज्ज्ञ लक्ष वेधत आहेत.

काय आहे बुधवारचे गणित

loading image