IPL 2019 : कोणतेच ग्राउंड नसते मोठ्ठे : रसेल 

वृत्तसंस्था
रविवार, 7 एप्रिल 2019

रसेलची कमाल 
- आयपीएलमध्ये सर्वाधिक स्ट्राइक रेट 189.46 
- 54 सामन्यांतील 43 डावांत 579 चेंडूंत 1097 धावा. 
- दुसऱ्या क्रमांकावर बन कटिंग (15 डावांत 128 चेंडूंत 174.21च्या स्ट्राइक रेटने 223 धावा) 

किमान 125 चेंडू खेळणे या निकषानुसार प्रमुख फलंदाजांचे स्ट्राइक रेट असे (धावा-चेंडू-स्ट्राइक रेट) ः 
सुनील नारायण (662-389-170.17), एबी डीव्हीलीयर्स (4109-2713151.45) 
विराट कोहली (5110-3912-130.62) 

बंगळूर : "माझ्यासाठी जगातले कुठलेच ग्राउंड मोठ्ठे नय्ये. ऑस्ट्रेलियातली काही ग्राउंड मोठी असल्याचे मला वाटले होते, पण तेथेही स्टॅंडमध्ये चेंडू भिरकावून देत मी स्वतःलाच चकित केले,' असे उद्गार कोलकाता नाईट रायडर्सचा पॉवरहीटर आंद्रे रसेल याने व्यक्त केली. 

रसेलने शुक्रवारी रात्री आरसीबीविरुद्ध तोफ डागत केकेआरला अशक्‍यप्राय विजय मिळवून दिला. त्यानंतर तो म्हणाला की, मी माझ्या क्षमतेवर, ताकदीवर विश्‍वास ठेवतो. माझ्या बॅटचा वेग चांगला आहे. त्याविषयीसुद्धा मला खात्री असते. मला इतर सहकाऱ्यांची चांगली साथ मिळते. परिणामी मला नैसर्गिक खेळ प्रदर्शित करण्याची मोकळीक मिळते. मी खांदे जास्त वर नेत शॉट मारत नाही, अन्यथा तुम्ही अडचणीत येऊ शकता. आता हा तांत्रिक मुद्दा मी फार स्पष्ट करून सांगू शकत नाही, त्याऐवजी मैदानावर प्रात्यक्षिक दाखविण्याचा माझा प्रयत्न असतो.' 

डगआउटमधील टीव्हीवरच अंदाज! 
केकेआरचा कर्णधार दिनेश कार्तिक याने खेळपट्टीचा अंदाज घेण्यासाठी काही चेंडू सावध खेळण्याचा सल्ला दिला होता. याविषयी तो म्हणाला की, "डगआउटमधील टीव्हीवर मी सामना पहात होतो. त्यामुळे पुरेसा अंदाज आला होता.' 

समीकरणाबद्दल तो म्हणाला की, "चेंडू आणि धावांचे प्रमाण पाहिले तर दरवेळी विजय मिळत नसतो. अशावेळी तुम्हाला क्षमता पणास लावावी लागते. टी-20 मध्ये एका षटकात पारडे फिरू शकते. त्यामुळेच मी कधीही प्रयत्न सोडून देत नाही. माझे मन एकदा म्हणत होते की जास्त धावा बाकी आहेत, पण मला झुंज द्यायची होती.' 

रसेलशी तुम्ही जास्त बोलायची गरज नसते. तो मैदानावर उतरतो. तो आनंदाने खेळतो. संघासाठी तो सर्वोत्तम प्रयत्न करतो. चेंडू फलंदाजापासून दूर वळत होता. त्यामुळे परिस्थिती आव्हानात्मक होती. आंद्रे जितकी चांगली फलंदाजी करतो आहे, तेवढेच लक्ष आम्हाला गोलंदाजीवर दिले पाहिजे. आमचे नियोजन योग्य आहे, पण त्याची मैदानावर अंमलबजावणी होण्याची गरज आहे. 
- दिनेश कार्तिक, केकेआर कर्णधार 

रसेलची कमाल 
- आयपीएलमध्ये सर्वाधिक स्ट्राइक रेट 189.46 
- 54 सामन्यांतील 43 डावांत 579 चेंडूंत 1097 धावा. 
- दुसऱ्या क्रमांकावर बन कटिंग (15 डावांत 128 चेंडूंत 174.21च्या स्ट्राइक रेटने 223 धावा) 

किमान 125 चेंडू खेळणे या निकषानुसार प्रमुख फलंदाजांचे स्ट्राइक रेट असे (धावा-चेंडू-स्ट्राइक रेट) ः 
सुनील नारायण (662-389-170.17), एबी डीव्हीलीयर्स (4109-2713151.45) 
विराट कोहली (5110-3912-130.62) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: When You are in The Zone, Just Dont Stop says Andre Russell