

Mary Dcosta connection with Palash Muchhal Smriti Mandhana
esakal
Smriti Mandhana-Palash Muchhal Wedding : भारतीय क्रिकेटर स्मृती मानधनाची आणि संगीतकार पलाश मुच्छल यांच्या लग्नाची मोठ्या धामधूममध्ये तयारी सुरू होती.. पण ही घाईगडबड अचानक थांबली आणि सोशल मीडियावर एका नावाने धुमाकूळ घातला Mary D'costa. स्मृतीच्या वडिलांच्या हृदयविकाराच्या झटक्यामुळे २३ नोव्हेंबरला सांगली येथे होणारे भव्य लग्न पुढे ढकलले गेले, पण लगेचच इन्स्टाग्रामवर पलाश आणि मेरी यांच्यातील कथित चॅट्सचे स्क्रीनशॉट्स व्हायरल झाले. या चॅट्समुळे पलाशवर फसवणुकीचे आरोप झाले आणि प्रश्न उभा राहिला ही मेरी डिकोस्टा कोण आहे? तिचा या सेलिब्रिटी जोडीच्या आयुष्यात काय संबंध?