देशद्रोहाचे आरोप झालेले PCB चे नवे चेअरमन नजम सेठी आहेत तरी कोण? | PCB Chairman Najam Sethi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

PCB Chairmen Najam Sethi

PCB Chairman Najam Sethi : देशद्रोहाचे आरोप झालेले PCB चे नवे चेअरमन नजम सेठी आहेत तरी कोण?

PCB Chairmen Najam Sethi : पाकिस्तान क्रिकेट बोर्डानचे चेअरमन रमीझ राजा यांची पदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे. रमीझ राजा यांनी इम्रान खान हे पंतप्रधान असताना पीसीबीचे चेअरमन नियुक्त करण्यात आले होते. आता मायदेशातील इंग्लंडविरूद्धची कसोटी मालिका 3 - 0 अशी गमावल्यानंतर राजांचा उचलबांगडी करण्यात आली आहे. पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी राजांच्या जागी आता नजम सेठी यांची नवे पीसीबी चेअरमन म्हणून नियुक्ती केली आहे.

हेही वाचा: BCCI Apex Council Meeting : बैठक संपली! द्विशतक ठोकूनही रहाणेला डच्चू; स्कायला मात्र बढती?

कोण आहेत नजम सेठी?

नजम अजीज सेठी हे पत्रकार आहेत. त्याबरोबर त्यांचे विविध व्यवसाय देखील आहे. ते द फ्रायडे टाईम्स नावाचे एक साप्ताहिक देखील चालवतात. याचबरोबर ते वॅनगार्ड बुर्कचे संस्थापक देखील आहेत. त्यांनी 2013 च्या निवडणुकीदरम्यान पंजाबचे कार्यवाहक मुख्यमंत्री म्हणून देखील काम सांभाळले आहे. याचबरोबर त्यांनी जिओ न्यूजवर प्राईम टाईम करंट अफेअर्स शो 'आपस की बाद' चे देखील संचालन केले होते. 1999 मध्ये नवाझ शरीफ सरकारने त्यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक केली होती. मात्र पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने त्यांची मुक्तता केली होती.

पूर्वीदेखील भुषवले आहे बोर्डाचे अध्यक्षपद

नजम सेठी यांनी यापूर्वी देखील पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्षपद भुषवले आहे. 2018 मध्ये इम्रान खान पंतप्रधान झाल्यानंतर त्यांना आपले पद सोडावे लागले होते. इम्रान खान यांनी सेठींनंतर एहसान मनी यांच्याकडे अध्यक्षपदाची जबाबदारी दिली होती. सेठी हे 2015 चे 2018 मध्ये पाकिस्तान सुपर लीगचे चेअरमन देखील राहिले आहेत. इम्रान खान पंतप्रधान झाल्यावर त्यांना आपले पद सोडावे लागले होते.

हेही वाचा: Ranji Trophy : रणजी ट्रॉफीतही दोन दिवसात खेळ खल्लास! दोन सामने संपले दोन दिवसात

नजम सेठी यांची पत्नी जुगनू सेठी देखील पत्रकार आहे. त्यांची दोन मुले अभिनय क्षेत्रात कार्यरत आहेत. मुलगा अली सेठी गायक आहे. तो कोक स्टुडिओमध्ये देखील भाग घेतला आहे. त्याचे पसूर गाणं हे स्पॉटीफायच्या व्हायरल 50 ग्लोबल चार्टमध्ये आले आहे. तर नजम सेठी यांची मुलगी मीरा सेठी ही अभिनेत्री आहे.

हेही वाचा : असं एक गाव, जिथं जमिनीला कान लावला तरी संगीत ऐकू येतं...