पहिला U19 वर्ल्डकप जिंकणारा निम्मा भारतीय संघ खेळला आंतरराष्ट्रीय क्रिकेट! | Who Is The India's First U19 World Cup Winner Captain How many Players Play International cricket | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Who Is The India's First U19 World Cup Winner Captain
पहिला U19 वर्ल्डकप जिंकणारा निम्मा भारतीय संघ खेळला आंतरराष्ट्रीय क्रिकेट!

पहिला U19 वर्ल्डकप जिंकणारा निम्मा भारतीय संघ खेळला आंतरराष्ट्रीय क्रिकेट!

नवी दिल्ली: वेस्ट इंडीजमध्ये सुरू असलेल्या U19 World Cup 2022 ची फायनल आज भारत (India U19) आणि इंग्लंड (England U19) यांच्यात अँटिग्वामध्ये खेळवली जाणार आहे. हा सामना आज ( दि. 5) सायंकाळी भारतीय वेळेनुसार 6.30 ला सुरू होईल. (India U19 vs England U19) यश धुलच्या (Yash Dhull) नेतृत्वाली 19 वर्षाखालील भारतीय संघाने कोरोना संसर्गाचे संकट झेलून फायनलपर्यंत मजल मारली. भारताने सेमी फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाचा 96 धावांनी पराभव केला होता. भारत आपल्या विक्रमी पाचव्या विजेतेपदासाठी आज जोर लावणार आहे. 19 वर्षाखालील वर्ल्डकपच्या इतिहासात डोकावताना भारताच्या या दैदिप्यमान कामगिरीची सुरूवात कधी झाली होती हेही पाहणे औत्सुक्याचे ठरेल. (Who Is The India's First U19 World Cup Winner Captain How many Players Play International cricket)

हेही वाचा: वॉर्नरच्या ऑफरला चहलचा रिप्लाय, दोघांत धनश्रीची एन्ट्री होईल?

भारताचा 19 वर्षाखालील वर्ल्डकपमधील विजेतेपदाचा दैदिप्यमान इतिहास सुरू झाला तो 2000 पासून. याच वर्षी भारताने आपला पहिला वहिला 19 वर्षाखालील वर्ल्डक जिंकला होता. त्यावेळच्या संघाचे नेतृत्व करत होता भारताचा माजी फलंदाज आणि अव्वल क्षेत्ररक्षक मोहम्मद कैफ (Mohammad Kaif). याच संघातून भारताला युवाराज सिंग (Yuvraj Singh) सारखा स्टार मॅचविनर देखील मिळाला होता. याचबरोबर या संघातील रितींदर सिंग सोधी, अजय रात्रा, वेणुगोपाल राव हे खेळाडू देखील भारतीय वरिष्ठ संघाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले होते.

हेही वाचा: U19 WC Final : टीम इंडिया वर्ल्ड कप जिंकणार?; मॅच कुठे पाहाल?

भारताने आपला दुसरा U19 वर्ल्डकप २००८ मध्ये जिंकला. या संघाचा विराट कोहली (Virat Kohli) कर्णधार होता. तिसरा वर्ल्डकप भारताने 2012 मध्ये उन्मुक्त चंदच्या (Unmukt Chand) नेतृत्वा जिंकला. सध्या उन्मुक्त चंद अमेरिकेकडून आपले नशीब आजमावत आहे. भारताने त्यानंतर पाच वर्षांनी म्हणजे 2018 ला भारताने आपल्या चौथ्या वर्ल्डकपवर विजयी मोहर उमटवली. या संघाचे नेतृत्व पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) करत होता. U19 वर्ल्डकप विजेत्या कर्णधारांच्या पुढील कारकिर्दिवर नजर टाकली तर उन्मुक्त चंदचा अपवाद वगळता इतर कर्णधारांनी वरिष्ठ भारतीय संघाकडून दीर्घ काळ आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले आहे. आता सध्याचा U19 भारतीय संघाचा कर्णधार यश धुल हा वारसा पुढे चावलतो का हे पहावे लागेल.

Web Title: Who Is The Indias First U19 World Cup Winner Captain How Many Players Play International Cricket

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..