Iranian teenage wrestler Saleh Mohammadi’s execution triggers global outrage
esakal
Saleh Mohammadi protest case details global reaction : इराणमध्ये युद्ध भडकलेले असताना एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कोममधील आंदोलनादरम्यान पोलिसांना ठार मारल्याच्या आरोपावरून, १९ वर्षीय इराणी कुस्तीपटू सालेह मोहम्मदीसह तिघांना सार्वजनिकरीत्या फाशी देण्यात आली. छळ आणि अन्यायपूर्ण खटल्याच्या आरोपांनी गाजलेल्या त्याच्या या प्रकरणामुळे, असंतोष आणि खेळाडूंवरील इराणच्या दडपशाहीवर संताप आणि टीका केली जात आहे. मोहम्मदीच्या फाशीच्या शिक्षेवर मानवाधिकार संघटना आणि आंतरराष्ट्रीय समुदायाकडून मोठ्या प्रमाणावर टीका होत आहे.