IND vs PAK : रविंद्र जडेजाची जागा कोण घेणार; अक्षर, अश्विन की दीपक हुड्डा?

Who Will Replace Ravindra Jadeja in India vs Pakistan Asia Cup Super 4 Match
Who Will Replace Ravindra Jadeja in India vs Pakistan Asia Cup Super 4 Match esakal

IND vs PAK Asia Cup 2022 Super 4 : आशिया कपची सुपर 4 फेरी सुरू झाली असून ग्रुप स्टेजप्रमाणे सुपर 4 मध्ये देखील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हाय व्होल्टेज सामना होणार आहे. मात्र या सामन्यापूर्वीच भारताला मोठा धक्का बसला. पाकिस्तानविरूद्धच्या पहिल्या सामन्यात विजयात मोठा वाटा उचलणारा रविंद्र जडेजा दुखापतीमुळे आशिया कपमधून बाहेर गेला आहे. आता सुपर 4 च्या सामन्यात त्याची जागा कोण घेणार हा प्रश्न आहे. सध्या रविंद्र जडेजाची रिप्लेसमेंट म्हणून अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन आणि दीपक हुड्डा यांची नावे समोर येत आहेत. (Who Will Replace Ravindra Jadeja in India vs Pakistan Asia Cup Super 4 Match)

Who Will Replace Ravindra Jadeja in India vs Pakistan Asia Cup Super 4 Match
Ind vs Pak : भक्त बाप्पाच्या चरणी, भारताच्या विजयासाठी शुभेच्छा देत म्हणाले...

रविंद्र जडेजा गुडघ्याच्या दुखापतीमुळे उर्वरित आशिया कपला मुकला आहे. त्यामुळे आजच्या पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यात त्याची रिप्लेसमेंट कोण हा यक्ष प्रश्न संघ व्यवस्थापनासमोर पडला आहे. दरम्यान, रविंद्र जडेजा दुखापतग्रस्त झाल्यानंतर स्टँडबाय असलेल्या अक्षर पटेलला संघात सामावून घेण्यात आले. तो देखील पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यात रविंद्र जडेजाची रिप्लेसमेंट असू शकतो. तो तळात फलंदाजीत आपले योगदान देऊ शकतो. तसेच पॉवर प्ले आणि मधल्या षटकात देखील प्रभावी फिरकी मारा करू शकतो.

Who Will Replace Ravindra Jadeja in India vs Pakistan Asia Cup Super 4 Match
Ind vs Pak T20 Live Asia Cup : काही तासातच रंगणार हाय व्होल्टेज क्रिकेट सामना !

अक्षर पटेल सोबतच रविचंद्रन अश्विनचा देखील एक पर्याय देखील आहे. अश्विनने आयपीएलमध्ये आपण कोणत्याही क्रमांकावर फलंदाजी करू शकतो हे दाखवून दिले आहे. त्याच्याकडे चांगली वैविध्यता देखील आहे. जर विकेट फिरकीला साथ देणारी असेल तर संघ व्यवस्थापन त्याचा देखील विचार करू शकते.

दीपक हुड्डा देखील एक चांगला पर्याय आहेत. दीपक हुड्डा मधल्या फळीत संघासाठी एक चांगला पर्याय आहे. याचबरोबर त्याची ऑफ स्पिन गोलंदाजी देखील उपयुक्त ठरू शकतो. मात्र रविंद्र जडेजाप्रमाणे तो खालच्या फळीत किती उपयुक्त ठरेल याबाबत थोडी शंका आहे.

जर रोहित शर्माने रविंद्र जडेजाच्या जागी एक अतिरिक्त फलंदाज खेळवण्याचा विचार केला तर त्याच्या दृष्टीने ऋषभ पंतपेक्षा चांगला पर्याय नाही. तो देखील डावखुरा धडाकेबाज फलंदाज आहे. त्यामुळे तो रविंद्र जडेजाचा फलंदाजीच्या बाबतीत चांगला पर्याय ठरू शकतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com