

Pune Grand Tour
Sakal
Why Pune was Chosen for India's First UCI 2.2 Grand Tour? : ‘‘भारतातील सायकलिंग संस्कृतीला नवसंजीवनी देण्याच्या उद्देशाने आणि ‘सायकल राजधानी’ अशी पुण्याची हरवलेली ओळख पुन्हा मिळवून देण्यासाठी स्पर्धेकरिता शहराची निवड केली, ’’ असे भारतीय सायकलिंग महासंघाचे महासचिव मनिंदर पाल सिंग यांनी सांगितले.
‘सकाळ’शी संवाद साधताना त्यांनी पुण्याची निवड, स्पर्धेचे नियोजन, अंमलबजावणीदरम्यान आलेली आव्हाने आणि स्पर्धेमुळे भारतीय सायकलिंगला मिळालेली नवी दिशा यावर सविस्तर भूमिका मांडली.