Ind vs Aus : 2022 पासून ODI खेळत नसतानाही रोहित शर्मा अन् BCCI ने अश्विनची निवड का केली?, जाणून घ्या कारण

Ind vs Aus ODI Series Team India Squad  R Ashwin
Ind vs Aus ODI Series Team India Squad R Ashwin
Updated on

Ind vs Aus ODI Series : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये 37 वर्षीय अश्विनचे ​​नाव आहे. 2017 मध्ये त्याला भारताच्या एकदिवसीय संघातून वगळण्यात आले होते. त्यानंतर तो फक्त दोनच एकदिवसीय सामने खेळला आहे.

2022 मध्ये त्याला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत शेवटची संधी मिळाली होती. अश्विनचा वर्ल्डकप संघात समावेश होणार की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतून खुलासा होईल, असे रोहित शर्माने म्हटले आहे.

Ind vs Aus ODI Series Team India Squad  R Ashwin
IND vs AUS: BCCI ने अचानक बदलला टीम इंडियाचा उपकर्णधार, 'या' खेळाडूला दिली जबाबदारी

आर अश्विनला एकदिवसीय संघात स्थान का दिले यांचे कारण सांगताना रोहित शर्मा म्हणाला की, अश्विनने जवळपास 100 कसोटी आणि 150 एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्याच्यासारख्या खेळाडूसोबत मैदानावर वेळ घालवणे चांगले आहे कोणतीही काळजी करण्यासारखे काही नाही. त्याने बराच काळपासून एकदिवसीय सामने खेळले नाहीत हे महत्त्वाचे नाही. खेळ त्याच्या शरीरापेक्षा त्याच्या मनात जास्त आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यामुळे तो कुठे आहे हे पाहण्याची संधी मिळेल.

अश्विनची निवड का केली?

एकदिवसीय वर्ल्डकप भारतात होणार आहे, जिथे मैदानातील खेळपट्टी फिरकी गोलंदाजांना मदत करते. भारताच्या सध्याच्या वर्ल्डकप संघात तीन फिरकी गोलंदाज आहेत. तिघेही डाव्या हाताचे आहेत. जडेजा आणि अक्षर जवळपास सारखीच गोलंदाजी करतात.

अशा परिस्थितीत जेव्हा फिरकी खेळपट्टीवर तीन फिरकी गोलंदाजांना संधी दिली जाईल, तेव्हा अक्षर आणि जडेजा यांना एकत्र एकत्र खेळवणे हे कुठेतरी टीम इंडियासाठी कठीण होईल. आशिया कपमध्येही अक्षर काही विशेष करू शकला नाही आणि कर्णधाराने त्याला षटकेही पूर्ण करायला संधी दिली नाहीत, असे दिसून आले.

आता अक्षर दुखापतग्रस्त आहे. अशा स्थितीत रोहित शर्मा आणि अजित आगरकर यांना अश्विनला तिसरा फिरकीपटू पर्याय म्हणून तयार ठेवायचा आहे.

Ind vs Aus ODI Series Team India Squad  R Ashwin
IND Vs AUS : वर्ल्डकपच्या आधी भारतीय संघाने बदलला कर्णधार! अश्विनची संघात एंट्री, जाणून घ्या कुणाला मिळाली संधी?

संघाबद्दल अजून बोलायला गेलं तर, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये केएल राहुलला कर्णधार बनवण्यात आले आहे. रोहित शर्मा, हार्दिक पांड्या आणि विराट कोहली यांना दोन सामन्यांसाठी विश्रांती देण्यात आली आहे. तिसऱ्या सामन्यात संघात परतणार आहेत. ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना 22 सप्टेंबर रोजी होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com