WI vs ENG : कॅरेबियन पॉवरचा धोबीपछाड! साहेबांनी पहिल्या सामन्याचा घेतला बदला अन् जोरदार पुनरागमन

इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली जात आहे....
WI vs ENG 2nd ODI Sam Curran and jos buttler England Beat West Indies Series 1-1
WI vs ENG 2nd ODI Sam Curran and jos buttler England Beat West Indies Series 1-1sakal

West Indies vs England 2nd ODI : इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यातील पराभवानंतर इंग्लंड संघाने दमदार पुनरागमन केले आहे. आणि 6 डिसेंबर (बुधवार) रोजी अँटिग्वा येथील रिचर्ड्स स्टेडियमवर झालेल्या दुसऱ्या सामन्यात वेस्ट इंडिजचा पराभव केला. सॅम करन आणि गस ऍटकिन्सन यांच्या उत्कृष्ट गोलंदाजीमुळे त्यांनी हा सामना सहज जिंकला. या सामन्यात सॅम करनने तीन तर गस ऍटकिन्सनने दोन महत्त्वाच्या विकेट घेतल्या.

WI vs ENG 2nd ODI Sam Curran and jos buttler England Beat West Indies Series 1-1
Ind vs Eng : शेफालीचे अर्धशतक पाण्यात...! पहिल्या टी-20 मध्ये भारताचा लाजिरवाणा पराभव

इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने मालिकेत सलग दुसऱ्यांदा नाणेफेक जिंकली आणि यावेळी त्याने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कारण पहिल्या एकदिवसीय सामन्यात प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय संघाच्या हिताचा नव्हता.

सुरुवातीला इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजांनी त्याचा पुरेपूर फायदा घेतला. अशा स्थितीत वेस्ट इंडिजचा संघ लगेचच बॅकफूटवर आला. पहिल्या सात षटकांत वेस्ट इंडिजची धावसंख्या 23 धावांत चार विकेट्स अशी होती.

कर्णधार शाई होप आणि शेरफेन रदरफोर्ड यांच्यात पाचव्या विकेटसाठी 129 धावांच्या भागीदारीने यजमानांना नाजूक परिस्थितीतून वाचवले. होपची 68 चेंडूत 68 धावा केल्या तर रदरफोर्डची 83 चेंडूत 60 धावांची खेळी केली. यामुळे वेस्ट इंडिज सन्मानजनक धावसंख्येपर्यंत नेले. वेस्ट इंडिजचा संघ 50 षटकेही खेळू शकला नाही आणि 39.4 मध्ये 202 धावांवर गडगडला.

WI vs ENG 2nd ODI Sam Curran and jos buttler England Beat West Indies Series 1-1
Schoolympics 2023 : आठ पदकांसह अभिनवची स्कूलिंपिकच्या जलतरण स्पर्धेत आघाडी कायम

203 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडने 32.5 षटकांत 4 गडी राखून विजय मिळवला. फिलिप सॉल्ट आणि विल जॅक यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 35 चेंडूत 50 धावांची भागीदारी केली. ही भागीदारी सहाव्या षटकात 4 चौकारांच्या मदतीने 21 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतलेल्या सॉल्टच्या विकेटने मोडली.

त्यानंतर 11व्या षटकात जॅक क्रोली वैयक्तिक 03 धावांवर बाद झाला. यानंतर 13व्या षटकात बेन डकेट 03 धावांवर बाद झाला. त्यानंतर शतकाकडे वाटचाल करणारा सलामीवीर विल जॅक 20 व्या षटकात 72 चेंडूत 73 धावा काढून बाद झाला. त्याच्या खेळीत 6 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश होता.

यानंतर कर्णधार जोस बटलर आणि हॅरी ब्रूक यांनी पाचव्या विकेटसाठी 78 चेंडूत 90* धावांची अखंड भागीदारी केली. आणि संघाला विजयापर्यंत नेले. बटलरने 45 चेंडूत 58* आणि ब्रूकने 49 चेंडूत 43* धावा केल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com