WI vs IND: कसोटीनंतर ODI सामन्यात भारतासमोर कॅरेबियन आव्हान, जाणून घ्या कुठे पाहता येणार फ्री सामना?

wi vs ind 1st odi 2023 series
wi vs ind 1st odi 2023 series

WI vs IND 1st ODI 2023 live streaming : पावसामुळे टीम इंडियाला वेस्ट इंडिजविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत विजय मिळू शकला नाही, पण रोहित शर्मा अॅड कंपनी गुरुवारपासून सुरू होणाऱ्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेची तयारी करत आहे.

कसोटीप्रमाणेच एकदिवसीय क्रिकेटमध्येही टीम इंडियाचे वेस्ट इंडिजवर वर्चस्व प्रदीर्घ काळापासून सुरू आहे. विंडीजने शेवटची वनडे मालिका 2006 मध्ये भारताविरुद्ध जिंकली होती. त्यानंतर भारताने विंडीजविरुद्ध सलग 12 एकदिवसीय मालिका जिंकली आहे. आता त्याचे लक्ष्य सलग 13व्या वनडे मालिकेवर असेल.

wi vs ind 1st odi 2023 series
SL vs PAK 2nd Test : सेलिब्रेशन पडले महागात! चालू कसोटी सामन्यात 'या' खेळाडूवर ICC ने घेतली मोठी अ‍ॅक्शन

एकदिवसीय विश्वचषक 2023 स्पर्धेतून बाहेर झाल्यानंतर वेस्ट इंडिजला त्यांच्या 50 षटकांच्या सामन्यात अन् संघात सुधारणा करावी लागेल. 27 जुलैपासून सुरू होणार्‍या मालिकेतील पहिले दोन सामने बार्बाडोसच्या केन्सिंग्टन ओव्हलवर खेळवले जातील. यानंतर दोन्ही संघ 1 ऑगस्टला त्रिनिदादला जातील, जिथे तिसरा एकदिवसीय सामना ब्रायन लारा क्रिकेट अकादमीत खेळवला जाईल. वनडे मालिकेनंतर टीम इंडियाला पाच टी-20 सामन्यांची मालिकाही खेळायची आहे.

wi vs ind 1st odi 2023 series
WI vs IND: भारतासाठी वेस्ट इंडिज मालिका किती महत्त्वाची? कर्णधार रोहित शर्माने मोठा केला खुलासा

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज पहिला वनडे कधी, कोठे, किती वाजता खेळला जाणार आहे?

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज पहिला वनडे 27 जुलै रोजी केन्सिंग्टन ओव्हल, बार्बाडोस येथे भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7:00 वाजता खेळल्या जाणार आहे.

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज पहिला एकदिवसीय सामना भारतात कुठे पाहू शकतो?

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज पहिल्या एकदिवसीय सामन्याचे थेट प्रक्षेपण डीडी स्पोर्ट्सवर होईल. डीडी स्पोर्ट्स हा सामना वेगवेगळ्या भाषांमध्ये प्रसारित करेल. हे फक्त मोफत DTH वर पाहता येईल.

तर, हा सामना तुम्ही जिओ सिनेमा आणि फॅनकोड अॅप आणि वेब साइटवर ऑनलाइन पाहू शकता. तुम्ही Jio Cinema अॅप किंवा वेबसाइटवर सामना विनामूल्य पाहू शकाल. त्याचबरोबर फॅनकोडवर पाहण्यासाठी निश्चित किंमत मोजावी लागेल. या सामन्याशी संबंधित बातम्या तुम्ही https://www.esakal.com/krida वर वाचू शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com