Video : सिराजनं असं काही केलं की विंडीजच्या फॅनला बसला जबर धक्का

WI vs IND Mohammed Siraj bowled Out Kyle Mayers West Indies Female Fan Reaction Video Gone Viral
WI vs IND Mohammed Siraj bowled Out Kyle Mayers West Indies Female Fan Reaction Video Gone Viralesakal

नवी दिल्ली : तिसऱ्या वनडे सामन्यात (West Indies Vs India 3rd ODI) भारताने वेस्ट इंडीजचा 119 धावांनी पराभव करत तीन सामन्यांची मालिका 3 - 0 अशी खिशात घातली. भारताकडून शुभमन गिलच्या (Shubman Gill) 68, शिखर धवनच्या 58 आणि श्रेयस अय्यरच्या 44 धावा केल्या. मात्र भारताच्या विजयात युझवेंद्र चहल आणि वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) यांनी मोलाचे योगदान दिले. चहलने 4 तर सिराजने दोन विकेट घेतल्या.

WI vs IND Mohammed Siraj bowled Out Kyle Mayers West Indies Female Fan Reaction Video Gone Viral
Video : विजयची हाणामारी! डीकेचं भूत काही मानगुटीवरून उतरत नाही

डकवर्थ लुईस नियमानुसार वेस्ट इंडीजसमोर 35 षटकात 257 धावांचे आव्हान होते. विंडीजला हे आव्हान पार करण्यासाठी आक्रमक फलंदाजी करण्याची गरज होती. मात्र मोहम्मद सिराजने विंडीजला सलग दोन धक्के देत त्यांच्या मनसुब्यांना सुरूंग लावला. मोहम्मद सिराजने आपल्या पहिल्याच षटकाच्या पहिल्याच चेंडूवर कायल मायेर्सचा त्रिफळा उडवला. मायेर्सची दांडी गुल करताच विंडीजच्या एका महिला प्रेक्षकाने (West Indies Female Fan) धक्कादायक रिअॅक्शन दिली. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

WI vs IND Mohammed Siraj bowled Out Kyle Mayers West Indies Female Fan Reaction Video Gone Viral
IPL फ्रँचायजींची जगभरात 'दादागिरी', गिलख्रिस्टने केली टिका

मोहम्मद सिराजने पहिल्या षटकातच्या पहिल्या चेंडूवर मायेर्सला बाद केल्यानंतर शमरह ब्रुक्सला देखील त्याच षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर पायचित पकडले. मोहम्मद सिराजने सामन्याच्या दुसऱ्याच षटकात विंडीजचे दोन फलंदाज बाद करत त्यांच्यावर दबाव निर्माण केला. या दबावाचा सामना विंडीजच्या फलंदाजीला करता आला नाही. सिराजनंतर युझवेंद्र चहलने विंडीजच्या फलंदाजीला खिंडार पाडले. त्याने 17 धावा देत 4 विकेट घेतल्या. सिराजने 14 धावा देत 2 विकेट घेतल्या. विंडीजचा संपूर्ण डाव 137 धावात संपुष्टात आला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com