esakal | Euro 2020 Final : कोणता संघ ठरणार युरोचा हिरो?
sakal

बोलून बातमी शोधा

England vs Italy

Euro 2020 Final : कोणता संघ ठरणार युरोचा हिरो?

sakal_logo
By
संजय घारपुरे - सकाळ वृत्तसेवा

इंग्लंड आणि इटली यांच्यातील युरो स्पर्धेत कोण जिंकणार याचे वेध लागले आहेत. प्रतिस्पर्धी संघ लढतीची तयारी करताना एकमेकांवरील दडपण कसे वाढेल यासाठीही प्रयत्न करतील. नजर टाकूयात दोन्ही संघातील आतापर्यंचा स्पर्धेतील प्रवास आणि संघातील जमेच्या बाजूसह खेळण्याची खास शैली आणि दोन्ही संघातील उणीवा कोणत्या आहेत यावर

इंग्लंडच्या संघाने क्रोएशियाला 1-0, स्कॉटलंड 0-0, चेक प्रजासत्ताक 1-0, जर्मनी 2-0, युक्रेन 4-0 आणि डेन्मार्क 2-1 अस पराभूत करत फायनल गाठली आहे. प्रतिस्पर्ध्यांना रोखण्यासाठी काहीही करण्यास तयार असलेली बचावफळी. स्टर्लिंगची चपळाई तसेच केनची प्रतिस्पर्ध्यांना गुंगारा देण्याची हातोटी ही इंग्लंड संघाची जमेची बाजू इटलीची डोकेदुखी ठरु शकते. ताकदवान राखीव खेळाडू सामन्याचे चित्र बदलू शकतात. चाहत्यांकडून मिळणारे प्रोत्साहन यात आणखी भर टाकेल.

इंग्लंडच्या संघाला फायनमध्ये बाजी मारायची असेल तर मधल्या फळीत कौशल्यपूर्ण खेळाचा तसेच प्रतिस्पर्ध्यांना धक्का देणारा खेळ करण्याची उणीव भरून काढावी लागेल. आक्रमणात जाण्याची तयारी असलेले बचावपटू. इटलीला भेदणे इंग्लंडसाठी अवघड आहे. यासंदर्भात इंग्लंडची रणनिती सामन्याचा निकाल ठरवू शकेल. महत्त्वाच्या स्पर्धेतील विजेतेपदाचा 55 वर्षांचा दुष्काळ संपवण्याची संधी आणि तीही घरच्या मैदानावर इंग्लंडला आहे. या संधीच सोन करण्याच्या इराद्याने ते मैदानात उतरतील.फ्री किकवरील अपयश तसेच इटलीची वेगवान प्रतिआक्रमणे रोखण्याचे आव्हान इंग्लंडला पेलावे लागेल.

हेही वाचा: 'फॅमिली मॅन'! मेस्सीनं ग्राउंडमधूनच केला बायकोला व्हिडिओ कॉल

लक्षवेधक खेळाडू : पॉल स्टर्लिंग, हॅरी केन, ल्युक शॉ, काईल वॉकर

इटलीच्या संघाने तुर्की 3-०, स्वित्झर्लंड, वेल्स 1-0-, ऑस्ट्रिया 2-1. बेल्जीयम 2-1. स्पेन 1-1 (पेनल्टी 4-2). असे पराभूत करत फायनलपर्यंत मजल मारली आहे. भक्कम बचावफळी तसेच त्यांना तोलामोलाची साथ देणारी मधली फळी. उजव्या तसेच डाव्या बगलेतून होणारी वेगवान आक्रमणे ही इटलीची जमेची बाजू आहे. सातत्याने आक्रण करण्यातही संघ आघाडीवर दिसतो.

प्रतिआक्रमणास वेग देण्यासाठी बचावपटूही सहभागी होतात, त्यामुळे गोलरक्षक आणि बचावपटूतील अंतर वाढते, त्याचा फायदा स्टर्लिंग, केन घेऊ शकतात. इटली संघ पूर्ण तंदुरुस्त नाहीत, तसेच कमालीचा वेगवानही नाही हे स्पेनने दाखवून दिले होते. यात सुधारणा आवश्य आहे. तरच त्यांना विजयी नोंदवता येईल.

हेही वाचा: मेस्सीचं स्वप्न साकार; 28 वर्षांनी अर्जेंटिनाने जिंकली फायनल!

पेनल्टी शूटआऊट तसेच जादा वेळेत लढती जिंकल्यामुळे प्रतिकूल परिस्थितीतही जिंकू शकतो हा आत्मविश्वास इटलीकडे आहे. बचावास जास्त दिलेले महत्त्व त्यांच्यासाठी धोकादायक ठरू शकते हे स्पेनने दाखवले, हेच इंग्लंडचा ताफाही करू शकतो.

महत्त्त्वाचे खेळाडू : लॉरिअस इनसाईन, सिरो इममोबाईल, जॉर्गिन्हो

प्रतिस्पर्ध्यांची कामगिरी

तपशील इंग्लंड इटली

स्पर्धेत गोल 10 12

स्वीकारलेले गोल 1 3

शॉट 58 108

ऑन टार्गेट 25 30

यशस्वी पास 2964 2993

चेंडूवर वर्चस्व 54.2% 52.3%

फाउल 58 72

loading image