Wimbledon : जोकोविचचा षटकार! नदाल-फेडररच्या विक्रमाशी बरोबरी

पहिला सेट जिंकलेल्या बेरेट्टिनीला पहिल्या फायनलमध्ये पराभवाचा सामना करावा लागला
Novak Djokovic
Novak DjokovicTwittter

टेनिस जगतातील अव्वल मानांकित नोवोक जोकोविचने सातव्या मानांकित इटलीचा मॅट्टेओ बेरेट्टिनी याला 6-7(4), 6-4, 6-4, 6-3 पराभूत करत विम्बल्डनचे सहावे जेतेपद पटकावले. या विजयासह त्याने राफेल नदाल आणि रॉजर फेडरर यांच्या 20 ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकण्याच्या विक्रमाशी बरोबरी केलीये. सामन्याच्या सुरुवातीला जोकोविचने 4-2 अशी आघाडी घेतली होती. पण बेरेट्टिनी टाई ब्रेकमध्ये पहिला सेट जिंकला. पहिला सेट गमावलेल्या जोकोविचने पुन्हा दमदार कमबॅक करत पहिल्यांदा विम्बल्डनची फायनल खेळणाऱ्या बेरेट्टिनीला सहज पराभूत केले. (Wimbledon 2021 Mens Singles Final Novak Djokovic Wins Record Equaling 20th Grand Slam Title)

Novak Djokovic
शफालीचं अर्धशतक हुकलं; पण तिने 'त्या' एका ओव्हरमध्ये जिंकलं!

जोकोविचने 30 ग्रँडस्लॅममधील 20 वेळा विजेतेपद पटकावले असून 10 वेळा तो रनरअप राहिला आहे. 2008 मध्ये हार्ड कोर्टवर ऑस्ट्रेलियन ओपनच्या जेतेपदाने त्याने ग्रँडस्लॅम जेतेपदाला सुरुवात केली. 2011 मध्ये जोकोविचने ऑस्ट्रेलियन ओपन, विम्बल्डन आणि अमेरिकन ओपन स्पर्धा जिंकली होती. 2012 आणि 2013 मध्ये ऑस्ट्रेलियन ओपनवरील आपली बादशाहत त्याने कायम ठेवली.

Novak Djokovic
'फॅमिली मॅन'! मेस्सीनं ग्राउंडमधूनच केला बायकोला व्हिडिओ कॉल

2014 विम्बल्डन आणि ऑस्ट्रेलियन ओपन जिंकण्याचा पराक्रम त्याने केला. 2015 मध्ये त्याने विम्बल्डन आणि अमेरिकन ओपन स्पर्धेत बाजी मारली. 2016 मध्ये त्याने ऑस्ट्रेलियन ओपनसह फ्रेंच ओपन स्पर्धा जिंकली. 2018 मध्ये अमेरिकन ओपन आणि विम्बल्डन, 2019 मध्ये फ्रेंच ओपन वगळता तिन्ही ग्रँडस्लॅम स्पर्धेत त्याने छाप सोडली. 2020 मध्ये ऑस्ट्रेलियन ओपननंतर त्याने यंदाच्या वर्षी 2021 ऑस्ट्रेलिया ओपन, फ्रेंच ओपन पाठोपाठ आता विम्बल्डनचे मैदान मारले आहे. त्याला कॅलेंडर स्लॅमसह ऑलिम्पिक पदकासह गोल्डन स्लॅम पूर्ण करण्याची संधी आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com