esakal | Wimbledon : फेडररला आउट करणारा हिरो बेरेट्टिनीसमोर ठरला झिरो!
sakal

बोलून बातमी शोधा

Matteo Berrettini

Wimbledon : फेडररला आउट करणारा हिरो बेरेट्टिनीसमोर ठरला झिरो!

sakal_logo
By
सुशांत जाधव

इटलीच्या सातव्या मानांकित मॅट्टेओ बेरेट्टिनीने रॉजर फेडररला स्पर्धेबाहेर काढणाऱ्या हुबेर्ट हुर्काझचा खेळ खल्लास केला. या सामन्यातील विजयासह मॅट्टेओ बेरेट्टिनीने पहिल्यांदाच विम्बल्डनची फायनल गाठलीये. पोलंडच्या हुबेर्ट हुर्काझ विरुद्धच्या सामन्यात मॅट्टेओने सुरुवातीपासूनच मजबूत पकड मिळवली होती. पहिल्या दोन सेटमध्ये त्याने निर्विवादित वर्चस्व राखले. दोन्ही सेट त्याने 6-3 आणि 6-0 असे आपल्या नावे करत फायनल खेळण्याचे इरादे स्पष्ट केले. (Wimbledon 2021 Semifinals Italys Matteo Berrettini beats Hubert Hurkacz to Reach First Wimbledon Final)

लढाई अजून संपली नाही, असा तोरा दाखवत पोलंडच्या हुबेर्ट हुर्काझ याने तिसऱ्या सेटमध्ये त्याला तगडी फाईट दिली. 6-7 (3-7) अशा फरकाने तिसरा सेट जिंकून हुबेर्ट हुर्काझने कमबॅक केले. पण त्यानंतर पुन्हा दिमाखदार खेळ करत मॅट्टेओ बेरेट्टिनीने चौथा सेट 6-4 असा जिंकत फायनलमधील प्रवेश निश्चित केला. पोलंडच्या हुबेर्ट हुर्काझ याने स्वित्झर्लंडचा दिग्गज टेनिस स्टार रॉजर फेडररला स्पर्धेतून बाहेर काढत सेमीफायनपर्यंत प्रवेश केला होता. स्पर्धेतील मोठा उलठफेर नोंदवणाऱ्या हुबेर्ट हुर्काझ याचा स्पर्धेतील प्रवास संपुष्टात आला.

हेही वाचा: ICC पुरस्काराचा 'स्नेह'

काय झालं हे समजायला थोडा वेळ लागेल

सामन्यानंतर मॅट्टेओ बेरेट्टिनीने सर्वांचे आभार मानले. तो म्हणाला की, जे काही झाले ते समजण्यासाठी काही वेळ द्यावा लागेल. मी एवढं मोठ स्वप्न कधीच पाहिलं नव्हते. या क्षण खूप आनंददायी आहे, अशी प्रतिक्रिया त्याने पहिल्यांदाच फायनल गाठल्यानंतर दिली. या कोर्टवर खेळताना सर्वोत्तम कामगिरी करावीच लागते. तिसऱ्या सेटवेळी सामना जिंकण्याचा आत्मविश्वास वाटला. पण हा सेट गमवावा लागला. प्रतिस्पर्धी तगडा असला तरी शेवटचच्या सेटमध्ये उंचावलेल्या आत्मविश्वासाचा फायदा झाला.

पहिल्यांदाच गाठली ग्रँडस्लॅमची फायनल

इटलीच्या सातव्या मानांकित मॅट्टेओ बेरेट्टिनीने पहिल्यांदा ग्रँडस्लॅमची फायनल गाठली आहे. यापूर्वी त्याने अमेरिकन ओपन स्पर्धेत सेमीफायनलपर्यंत धडक मारली होती. ही त्याची आतापर्यंतची सर्वोच्च कामगिरी होती. तिसऱ्यांदा तो विम्बल्डन स्पर्धेत खेळत आहे. 2019 मध्ये त्याने चौथ्या फेरीपर्यंत मजल मारली होती. त्यापूर्वी 2018 मध्ये त्याला दुसऱ्या फेरीतच गाशा गुंडळावा लागला होता.

loading image