esakal | ICC पुरस्काराचा 'स्नेह'
sakal

बोलून बातमी शोधा

Sneh Rana

ICC पुरस्काराचा 'स्नेह'

sakal_logo
By
सुशांत जाधव

भारतीय संघाची सलामीची फलंदाज शफाली वर्मा आणि अष्टपैलू स्नेह राणा आयसीसी 'वुमन्स प्लेयर ऑफ द मंथ' च्या शर्यतीत आहेत. जूनच्या सर्वोत्तम खेळाडूंच्या यादीत भारतीय संघातील एकाही पुरुष खेळाडूचा समावेश नाही. शफाली आणि राणा यांच्यासोबत इंग्लंडची सोफी एक्लेस्टोनही देखील शर्यतीत आहे. आयसीसी 'मेन्स प्लेयर ऑफ द मंथ'च्या शर्यतीत डेवॉन कॉन्वे कायले जेमीन्सन आणि क्विंटन डिकॉक यांच्या नावाचा समावेश आहे. (Another Indian Star All Rounder Sneh Rana ICCs Womens Player of the Month for June)

भारतीय महिला संघाने सात वर्षांच्या कालावधीनंतर इंग्लंडमध्ये कसोटी सामना खेळला होता. या सामन्यातून पाच वर्षानंतर टीम इंडियात कमबॅक करताना स्नेह राणाने कसोटीत पदार्पण केले होते. सलामीची फलंदाज शफाली वर्मा आणि स्मृती मानधना यांच्या धडाकेबाज खेळीनं महिला संघाने सुरुवात दमदार केली. पण या दोघी अर्धशतकानंतर माघारी फिरल्या. भारतीय महिला संघावर फॉलोऑनची नामुष्की ओढावल्यानंतर स्नेह राणाने आश्वासक खेळी करत कसोटी सामना अनिर्णित राखण्यात मोलाचा वाटा उचलला होता.

हेही वाचा: ENG v PAK :स्टोक्सनं मोडला धोनीचा खास रेकॉर्ड

स्नेह राणाने आपल्या पदार्पणाच्या कसोटी सामन्यात 154 चेंडूत नाबाद 80 धावांची खेळी केली होती. या सामन्यात तिला शतकाची संधी होती. गोंधळामुळे तिची पहिली वहिली शतकी खेळी हुकली होती. या कसोटी सामन्यात स्नेहने 131 धावा खर्च करुन 4 विकेटही घेतल्या होत्या. त्यामुळे तिची दावेदारी भक्कम दिसते.

भारताची युवा फलंदाज शफाली वर्मा हिने देखील इंग्लंड विरुद्धच्या कसोटी सामन्यात लक्षवेधी कामगिरी केली होती. पहिल्या डावात तिने 96 धावांची खेळी केली होती. तर दुसऱ्या डावातही तिने 63 धावांची खेळी केली होती.

हेही वाचा: "BCCI ने धोनीची जर्सी नंबर 7 रिटायर करावी"

पुरुष गटातून न्यूझीलंडचा स्टार गोलंदाज कायले जेमीन्सन आणि सलामीचा फलंदाज डेवॉन कॉन्वे यांची नावे आघाडीवर आहेत. जेमीन्सनने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेत 61 धावा खर्च करुन 7 विकेट मिळवल्या होत्या. त्याने या सामन्यात रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा ऋषभ पंत शिवाय दोन्ही डावात कर्णधार विराट कोहलीची विकेट घेतली होती. डेवॉन कॉन्वे याने जूनमध्ये पदार्पणाच्या सामन्यात क्रिकेटची पंढरी समजली जाणाऱ्या लॉर्डस्च्या मैदानात द्विशतकी खेळी केली होती. त्यानंतर दोन सामन्यात त्याने दोन अर्धशतकेही झळकावली आहेत. 12 जूनला पुरस्कार कोणाला मिळणार याची घोषणा होईल.

loading image