
लंडन : हिरवळीच्या कोर्टवर खेळल्या जाणाऱ्या विम्बल्डन या अत्यंत प्रतिष्ठेच्या टेनिस स्पर्धेला उद्यापासून (ता. ३०) सुरुवात होत आहे. पुरुषांच्या एकेरी विभागात स्पेनचा कार्लोस अल्काराझ व महिला एकेरी विभागात बेलारूसची अरीना सबलेंका हिच्याकडे जेतेपदासाठी प्रबळ दावेदार म्हणून बघितले जात आहे. अल्काराझ सलग तिसऱ्यांदा या स्पर्धेच्या जेतेपदाला गवसणी घालण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करताना दिसणार आहे.