
गेल्या महिन्यातच झालेल्या फ्रेंच ओपन अंतिम सामन्यात संघर्ष करणारे कार्लोस अल्काराझ आणि यानिक सिनिर आज विम्बल्डनच्या अंतिम सामन्यात पुन्हा एकेमेकांविरुद्ध लढणार असल्यामुळे उत्सुकता ताणली आहे. सलग दोन ग्रँडस्लॅम स्पर्धांमध्ये समान प्रतिस्पर्धी पुन्हा आमनेसामने येणार आहेत. याअगोदर २००६ ते २००८ मध्ये रॉजर फेडरर आणि राफेल नदाल यांच्यातला संघर्ष रंगतदार झाला होता.