
-नितीन मुजुमदार
भारतीय क्रीडारसिक जे शब्द ऐकत लहानाचे मोठे होतात त्यात क्रिकेट, ऑलिंपिक्स आणि विंबल्डन हे तीन शब्द प्रामुख्याने असणारच! नेमेचि येतो ...या उक्तीप्रमाणे पावसाळ्याबरोबरच विंबल्डन स्पर्धेसही जून अखेर सुरुवात होईलच. जगभरातल्या टेनिस रसिकांशी विंबल्डन स्पर्धेचा एक खास कनेक्ट आहे.
आधुनिकतेची कास धरताना भौतिक गोष्टींचा अतिरेक साऱ्या जगात होताना दिसतोय. नाही म्हणायला परंपरा जपणाऱ्या विंबल्डनने देखील यंदापासून अगदी मर्यादित प्रमाणात का होईना पण ए.आय. ला पायघड्या घातल्या आहेत. तरीही अजून विंबल्डन या शब्दाबरोबर परंपरा घट्ट जोडल्या गेल्या आहेतच. केवळ टेनिस रसिक नव्हे तर टेनिसपटूंना देखील विंबल्डन विषयी खास ममत्व असते. तुम्हाला ब्रिटिशांचा स्वभाव आवडो न आवडो, त्यांच्या परंपरा ते कसोशीने जपत असतात.