Winter Olympics: चीन कोरोनाग्रस्त खेळाडूंना उपाशी ठेवतयं?

Winter Olympics Russian Athlete Allegation China Deliberately Starving COVID 19 Positive Player
Winter Olympics Russian Athlete Allegation China Deliberately Starving COVID 19 Positive Player esakal

चीनमध्ये सुरू असलेले बिजिंग विंटर ऑलिम्पिक सुरूवातीपासूनच वादाच्या भोवऱ्यात अडकले आहे. अनेक देशांनी चीनमधील विंटर ऑलिम्पिकवर राजनैतिक बहिष्कार घातला आहे. तरीही चीनची खोड काही जात नाही. आता रशियाच्या बायथ्लॉनपटू वलेरिया वस्नेतसोव्हाने (Valeria Vasnetsova) विंटर ऑलिम्पिक (Winter Olympics) आयोजकांवर तिला खाण्यास योग्य नसलेले जेवण दिल्याचा आरोप केला आहे. वलेरिया ही विंटर ऑलिम्पिक दरम्यान कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली होती. (Beijing Winter Olympics Bad Food Quality)

रशियन खेळाडू (Russian Athlete) वलेरियाने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून विंटर ऑलिम्पिकमध्ये देण्यात येणाऱ्या जेवणाचा (Food For COVID 19 Players) फोटो शेअर केला आहे. त्यात थोडा पास्ता, काही बटाट्याचे तुकडे, जळालेले मांसाचे काही तुकडे आणि ऑरेंज सॉस यांचा समावेश आहे. वलेरिया आपल्या पोस्टमध्ये लिहिते की तिला गेली पाच दिवस एकच नाष्टा, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण दिले जात आहे.

ती आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये (Instagram Post) लिहिते की, 'माझे पोट खराब झाले आहे. माझा चेहरा उतरला आहे. डोळ्याखाली काळी वर्तुळे तयार झाली आहेत. मला हे सर्व संपावे असे वाटते. मी रोज रडत आहे. मी खूप कंटाळली आहे. ते मला जे काही वाईट जेवण देत आहेत ते मी मुकाट्याने खात आहे कारण मला खूप भूक लागली आहे. माझी हाडं देखील बाहेर आली आहे.'

वलेरियाने कोरोनाची लागण झालेल्या इतर लोकांना काय जेवण दिले जाते याची माहिती ही घेतली. तिने सांगितले की जे विंटर ऑलिम्पिकमधील खेळाडू नाहीत त्यांचे आणि आमचे जेवण वेगवेगळे आहे. माझ्या संघातील कोरोनाची लागण झालेल्या डॉक्टरांना रोज ताजी फळे, ब्रोकोली आणि प्राँज दिले जात आहेत. वलेरियाच्या तक्रारीनंतर रशियाच्या बाथ्लॉन (Biathlon) संघाचे प्रवक्ते सेरगी अव्हरयानोव्ह यांनी सांगितले की आता वलेरियाला चांगले जेवण देण्यात येत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com