Australia Cricket : ‘...तर ऑस्ट्रेलियाचा कसोटी संघ असेल कर्णधाराविना’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Michael Clarke

‘...तर ऑस्ट्रेलियाचा कसोटी संघ असेल कर्णधाराविना’

sakal_logo
By
टीम ई सकाळ

टीम पेनने आपल्या सहकाऱ्याला आक्षेपार्ह मेसेज पाठवल्याचे उघड झाल्यानंतर कर्णधारपद सोडले. त्यामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलिया (सीए) (Australia) नव्या कर्णधाराच्या (Without Captain) शोधात आहे. वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स कर्णधार होण्याच्या शर्यतीत आघाडीवर आहे. त्याच्याशिवाय माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथही शर्यतीत आहे. मात्र, कर्णधाराच्या नियुक्तीवर माजी कर्णधार मायकेल क्लार्कने (Michael Clarke) वक्तव्य केले आहे. या वक्तव्यात त्याने आपल्याच देशावर ताशेरे ओढले आहे.

टीम पेनने कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर ऑस्ट्रेलिया क्रिकेट प्रशासक कर्णधारपदासाठी निर्दोष रेकॉर्ड असलेल्या एखाद्या व्यक्तीचा शोध घेत असतील तर ऑस्ट्रेलियन कसोटी संघ पुढील १५ वर्षे कर्णधाराविना राहील. रिकी पाँटिंगने (Ricky Ponting) त्याच्या कारकिर्दीची चुकीची सुरुवात केल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा सर्वोत्तम कर्णधार बनला. ऑस्ट्रेलियन कसोटी कर्णधाराने उच्च मानके स्थापित करणे आवश्यक आहे. परंतु, त्याच्याकडून अवाजवी अपेक्षा ठेवल्या गेल्या तर फारच कमी पर्याय उरेल, असेही तो म्हणाला.

‘बिग स्पोर्ट्स ब्रेकफास्ट’ला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला, माझ्या काळात रिकी पाँटिंग सर्वोत्तम कर्णधार राहिला आहे. निर्दोष रेकॉर्ड नसतानाही त्याची कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. असे नसते केले तर तो कधीच ऑस्ट्रेलियाचे कर्णधार होऊ शकला नसता. बोर्बन अँड बीफस्टीक (नाइट क्लब) येथे त्यांच्यात भांडण झाले. यामुळे कोणालाही कर्णधार होण्यापासून थांबवू शकता येत नाही, असेही तो म्हणाला.

हेही वाचा: ...अन् मध्यरात्री आईला मुलगी प्रियकरासोबत दिसली नको त्या अवस्थेत

टीम पेनने कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर ऑस्ट्रेलिया क्रिकेट प्रशासक कर्णधारपदासाठी निर्दोष रेकॉर्ड असलेल्या एखाद्या व्यक्तीचा शोध घेत असतील तर ऑस्ट्रेलियन कसोटी संघ पुढील १५ वर्षे कर्णधाराविना राहील. रिकी पाँटिंगने त्याच्या कारकिर्दीची चुकीची सुरुवात केल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा सर्वोत्तम कर्णधार बनला. ऑस्ट्रेलियन कसोटी कर्णधाराने उच्च मानके स्थापित करणे आवश्यक आहे. परंतु, त्याच्याकडून अवाजवी अपेक्षा ठेवल्या गेल्या तर फारच कमी पर्याय उरेल, असेही तो म्हणाला.

loading image
go to top