esakal | आयर्लंडचा भारतावर टायब्रेकमध्ये विजय
sakal

बोलून बातमी शोधा

Hokcey

आयर्लंडचा भारतावर टायब्रेकमध्ये विजय

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

लंडन - भारताला विश्वकरंडक महिला हॉकी स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत आयर्लंडने टायब्रेकमध्ये ३-१ असे हरविले. निर्धारित वेळेत गोलशून्य बरोबरी झाली होती. यामुळे भारताची ऐतिहासिक कामगिरीची संधी हुकली.

टायब्रेकमध्ये दोन्ही संघांचे पहिले दोन प्रयत्न अपयशी ठरले. सविताने निकोला डॅली व ॲना ओफ्लॅनागन यांचे फटके अडविले, तर आयर्लंडच्या आयीषा मॅक्‌फेरॅन हिने राणी व मोनिका यांची निराशा केली. आयर्लंडचा तिसरा स्ट्रोक रोईसीन अप्टॉन हिने यशस्वी ठरविताना सविताला चकविले, त्यामुळे आयर्लंडने खाते उघडले. त्यानंतर नवज्योत कौरने निराशा केली. आयर्लंडचा चौथा प्रयत्न ॲलीन मिकेने यशस्वी ठरविला. आयर्लंडकडे २-० अशी आघाडी जमली. मग रीना खोकरवर चौथ्या स्ट्रोकच्या वेळी गोल करण्याचे दडपण होते, तिने गोल केला. त्यामुळे भारताला १-२ अशी पिछाडी कमी करता आली. मग आयर्लंडचा पाचवा स्ट्रोक श्‍लोई वॅटकिन्सने सत्कारणी लावला. त्याचबरोबर १-३ अशा पिछाडीसह भारताच्या आशा एक स्ट्रोक बाकी असूनही संपल्या. पाचवा स्ट्रोक घेण्याची गरजच पडली नाही.

loading image
go to top