INDW vs BANW : शेफालीचे अर्धशतक; भारताच्या टॉप ऑर्डरची दमदार कामगिरी

Shafali Verma
Shafali Verma ESAKAL

Women's Asia Cup T20 2022 India Women vs Bangladesh Women :

महिला आशिया कप 2022 मध्ये भारताचा विजयी रथ पाकिस्तानने रोखला होता. या पराभवातून सावरत भारतीय संघाने बांगलादेश विरूद्धच्या सामन्यात दमदार फलंदाजीचे प्रदर्शन केले. भारताने बांगलादेशविरूद्ध 20 षटकात 5 बाद 159 धावा केल्या यात सलामीवीर शेफाली वर्माच्या 55 तर स्मृती मानधनाच्या 47 धावांचे मोठे योगदान राहिले. जेमिमाह रॉड्रिग्जने देखील 24 चेंडूत नाबाद 35 धावांची खेळी केली.

Shafali Verma
Prithvi Shaw निराश! वजन कमी केलं, धावाही करतोय तरी...

कर्णधार हरमनप्रीत कौरच्या अनुपस्थितीत भारतीय संघाचे नेतृत्व करणाऱ्या स्मृती मानधनाने बांगलादेशविरूद्ध नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीवीर शेफाली वर्मा आणि स्मृतीने दमदार सलामी देत भारताच्या मोठ्या धावसंख्येचा पाया रचला. या दोघींनी 12 षटकात 96 धावांची सलामी दिली. दरम्यान, अर्धशतकाजवळ पोहचलेली स्मृती मानधना 47 धावांवर धावबाद झाली आणि ही सलामी जोडी फुटली.

Shafali Verma
Team India : टी-20 वर्ल्ड कप कसा जिंकणार? टूर्नामेंट सुरू होण्यापूर्वीच टीम इंडिया दुखापतीने घायाळ!

यानंतर शेफाली वर्माने आपले अर्धशतक पूर्ण केले. मात्र ती 55 धावा करून रुमाना अहमदची शिकार झाली. याच रुमानाने 17 व्या षटकात रिचा घोष (4) आणि किरण नवगिरे(0) यांना पाठोपाठ बाद करत भारताची अवस्था 4 बाद 125 धावा अशी केली. दरम्यान, जेमिमाह रॉड्रिग्ज आणि दिप्ती शर्मा यांनी भारताला दडशतकी मजल मारून दिली. दिप्ती 5 चेंडूत 10 धावा करत बाद झाली.

दिप्ती बाद झाल्यानंतर जेमिमाहने भारताला 20 षटकात 159 धावांपर्यंत मजल मारून दिले. तिने 24 चेंडूत नाबाद 35 धावांची खेळी केली. बांगलादेशकडून रुमाना अहमदने 3 षटकात 27 धावा देत 3 बळी टिपले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com