

Jemimah Rodrigues revealed How Women Cricketer Deal with Periods menstrual cramps during matches
esakal
Women Cricketer Periods Struggle : भारतीय महिला क्रिकेट संघाने आयसीसी विश्वचषक २०२५ जिंकून इतिहास रचला आहे. या विजयात स्टार फलंदाज जेमिमा रॉड्रिग्जची भूमिका अविस्मरणीय ठरली. ऑस्ट्रेलियाविरुद्ध उपांत्य फेरीत तिने १३४ चेंडूंमध्ये नाबाद १२७ धावांची खेळी साकारली. या विक्रमी कामगिरीमुळे भारताने अंतिम फेरी गाठली आणि विश्वचषक उंचावला. जेमिमाचे कौतुक देशभरात होत आहे. सोशल मीडियावर तिचे नाव ट्रेंडिंग आहे. पण याच वेळी तिचा एक जुना व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. रणवीर अलाहाबादियाच्या 'बीअरबायसेप्स' पॉडकास्टमधील ही मुलाखत ऐकून तुम्हीही थक्क व्हाल