Women's t20 world cup:भारतीय महिलांकडून अपेक्षाभंग; चौफेर कामगिरीकरत ऑस्ट्रेलियानं पटकावलं विजेतेपद

टीम ई-सकाळ
रविवार, 8 मार्च 2020

अंतिम सामन्याचा दबाव काय असोत हे भारतीय महिला खेळाडूंच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं. 

मेलबर्न (ऑस्ट्रेलिया) Women's t20 world cup : तब्बल 85 हजार क्रिकेटप्रेमींच्या साक्षीनं आज, येथे झालेल्या महिला टी-20 वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारताला चारीमुंड्या चीत केलं. ऑस्ट्रेलियानं चौफेर सरस कामगिरी करत, भारताचा 85 रन्सनी पराभव केला. स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियाला 17 रन्सनी पराभूत केलं होतं. तर, शेवटच्या सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारताला पराभूत करून विश्वचषकावर आपलं नाव कोरलं. ऑस्ट्रेलियाचं हे पाचवं टी-20 वर्ल्ड कप विजेतेपद आहे. अंतिम सामन्याचा दबाव काय असोत हे भारतीय महिला खेळाडूंच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं. ऑस्ट्रेलियाच्या खेळापुढं भारतीय महिलांचा संघ अगदी नवखा वाटत होता. ऑस्ट्रेलियाच्या 185 रन्सच्या आव्हानापुढं जणू भारतीय महिलांनी सगळी शस्त्रं म्यान केली होती. फायरलमध्ये पोहोचलेला हाच संघ, असं त्यांच्या खेळावरून वाटत नव्हतं. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आंतरराष्ट्रीय महिला दिनादिवशीच झालेल्या या टी-20 फायनलमध्ये भारतानं पहिल्यांदा प्रवेश केला होता. भारतीय महिला विजयी होतील अशी आशा प्रत्येक भारतीय क्रिकेट प्रेमीला होती. पण, जशी मॅच सुरू झाली. तसा चाहत्यांचा मूड गेला. सुरुवातीपासूनच ऑस्ट्रेलियानं भारतावर वर्चस्व मिळवलं होतं. त्यांच्या सलामी जोडीनं 115 धावा करून, विजयाचा पाया रचला होता. त्याच्या जोरावरच भारतापुढं त्यांनी 185 रन्सचं टार्गेट दिलं होतं. भारतीय महिला या टार्गेटच्या दबावाखाली आल्याचं दिसत होत्या. भारताचा खेळ सुरू झाल्यानंतर सगळी मदार ही धडाकेबाज सलामीवीर शेफाली वर्मावर होती. तिनं पहिल्याच बॉलवर उंच फटका मारून अपेक्षा वाढवल्या होत्या. पण, तिला त्या फटक्यावर दोनच रन्स करता आल्या. भारताच्या स्कोअरमध्ये तिचं योगदान हे फक्त त्या दोन रन्सचंच राहिलं. पुढच्या दोन बॉलमध्ये विकेटकीपरच्या हातात कॅच देऊन, पॅव्हेलियनमध्ये परतली होती. पहिल्याच ओव्हरमध्ये जोराचा झटका बसलेला भारतीय संघ त्यातून सावरला नाही. पुढच्या ओव्हरमध्ये तिसऱ्या क्रमांकावरची तानिया भाटिया जखमी झाल्यानं मैदानातून बाहेर गेली. त्यावेळी भारताचा स्कोअर पाच होता. त्यानंतर स्कोअर बोर्डवर 8 रन्सच असतान जेमीमा रोड्रिग्ज आऊट झाली. 

स्पोर्टसच्या आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

कॅप्टन हरमनप्रीत कौर आणि सलामीवीर  स्मृती मानधना या दोघींकडून भारताला खूप अपेक्षा होत्या. दोघी भारताला किमान संघर्ष तरी करून देतील, अशी अपेक्षा होती. पण, दबावाखाली त्याही झुकल्या. टीमच्य 18 रन्स असताना स्मृती (8 बॉलमध्ये 11 रन्स), तर, 30 रन्स असताना हरमन (7 बॉल्समध्ये 4 रन्स) बाद झाल्या आणि भारतीय संघ आणखी दबावाखाली आला. 4 बाद 30 अशा स्कोअरवरून टीम इंडिया विजय मिळवणं, अशक्य वाटू लागलं. होतं. शेवटच्या पाच ओव्हर्समध्ये भारताला 105 रन्सची गरज होती. तर 24 बॉल्समध्ये 97 असं अवघड टार्गेट होतं. त्यावेळी 88 रन्सवर व्ही कृष्णमूर्तीच्या निमित्तानं भारताची सहावी विकेट गेली होती. 19व्या ओव्हरमध्ये भारताची अवस्था 9 बाद 97 अशी होती. अखेर भारताचा डाव 99 रन्सवर संपुष्टात आला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Women's t20 world cup final Australia beat India 85 runs