Women`s T20 World Cup:पोरी सेमीफायनलसाठी सज्ज; श्रीलंकेवर 7 विकेट्सनी विजय 

टीम ई-सकाळ
Saturday, 29 February 2020

श्रीलंकेवर सात विकेट्सनी दणदणीत विजय मिळवून टीम इंडियानं आपण, सेमीफायनलमध्ये इंग्लंडला टक्कर देण्यासाठी सज्ज असल्याचं दाखखवून दिलंय.

मेलबर्न (ऑस्ट्रेलिया) : येत्या 5 मार्चला इंग्लंड विरुद्ध होणाऱ्या सेमीफायनलपूर्वी टीम इंडियाला आत्मविश्वास वाढवणारा विजय हवा होता. अगदी तसाच विजय आज टीम इंडियाच्या मुलींनी मिळवला. श्रीलंकेवर सात विकेट्सनी दणदणीत विजय मिळवून टीम इंडियानं आपण, सेमीफायनलमध्ये इंग्लंडला टक्कर देण्यासाठी सज्ज असल्याचं दाखखवून दिलंय.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

भारताकडून आज राधा यादवनं तिच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळी करत (23 धावांत 4 विकेट्स) भारताच्या विजयचा पाया रचला. तिच्या या सर्वोत्तम गोलंदाजीमुळं श्रीलंकेला 113 रन्सवर रोखण्यात टीम इंडियाला यश आलं. त्यावर भारतच्या शेफाली वर्मानं ओपनिंगचा आपला धडाका कायम ठेवत 47 रन्सची स्फोटक खेळी केली. तिला, दुदैवानं तिला अर्धशतक साजरं करता आलं नाही. शेफाली रन आऊट झाली. पण, आपल्या नेहमीच्या तडाखेबंद खेळीनं तिनं भारताचा विजय निश्चित केला होता. भरवशाची ओपनर स्मृती मानधना हिला केवळ 17 रन्सच करता आल्या. पण, शेफालीनं तिचा धडाका कायम ठेवून आपलं काम सुरूच ठेवलं होतं. त्यानंतर मधल्या फळीत हरमनप्रीत कौरनं टीमचा डाव सांभाळून, विजय निश्चित केला. श्रीलंकेच्या महिला खेळाडूंना त्यांच्या स्वैर गोलंदाजीचा आणि गचाळ फिल्डिंगचा फटका बसला. उलट भारतीय संघानं त्याचा फायदा घेऊन, सेमीफायनलपूर्वी आपल्या खात्यात आणखी एक विजय टाकला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Women`s T20 World Cup india won by 7 wickets against sri lanka