
अरे काय हे! फक्त 8 धावातच संघ 'ऑल आऊट'
नवी दिल्ली : क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे हे आपण कायम ऐकतो. एका चेंडूवर होत्याचं नव्हतं व्हायला वेळ लागत नाही. सामन्याचे चित्र कधी पालटेल याचा नेम नसतो. असाच एक भन्नाट किस्सा नेपाळच्या संघाबरोबर झाला. नेपाळला युएईच्या संघाने अवघ्या 8 धावांवर गुंडाळले. त्यानंतर 7 चेंडूत हे टार्गेट देखील पूर्ण केले. आंतरराष्ट्रीय स्तरावर नेपाळचा निच्चांकी स्कोर झाल्याने या सामन्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे.
हेही वाचा: टी20 लीग द्विपक्षीय अन् कसोटी क्रिकेट धोक्यात आणतयं : ICC संचालक
टी 20 19 वर्षाखालील महिला वर्ल्ड कप पात्रता फेरीत (Women's U19 World Cup Qualifier) युएई आणि नेपाळ यांचा सामना झाला. नेपाळने (Nepal Women's Cricket Team) नाणेफेक जिंकून आपल्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली. त्यांनी फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय काही क्षणातच एका वाईट स्वप्नात बदलला. त्यांच्या सहा फलंदाजांना खाते देखील उघडता आले नाही. नेपाळकडून स्नेहा माहराने सर्वाधिक 3 धावा केल्या. मनिषा राणाने दोन तर इतर तीन फलंदाजांनी एक - एक धाव केली. 20 षटकांच्या सामन्यात नेपाळचा डाव 8.1 षटकातच गुंडाळला गेला. युएईकडून वेगवान गोलंदाज महिका गौरने 2 धावा देत सर्वाधिक 5 विकेट घेतल्या.
हेही वाचा: दीपकचं लग्न, नटणं होणारच! रिसेप्शनला टीम इंडिया सुटा-बुटात
नेपाळ याआधीच्या सामन्यात कतारला 38 धावात गुंडाळले होते. त्यांनी सामना 79 धावांनी जिंकला. होता. मात्र आजच्या सामन्यात त्यांची अवस्था बिकट झाली. हा सामना एक तास देखील सुरू राहिला नाही. फक्त 9.2 षटकात सामन्याचा निकाल लागला. दोन्ही संघातील एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा पार करता आला नाही. युएईच्या तीर्थ सतिशने सर्वाधिक 4 धावा केल्या.
Web Title: Womens U19 World Cup Qualifier Nepal Collapse In 8 Runs Against Uae
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..