VIDEO : छोरिया छोरों से कम हैं के! शफालीचा एबी स्टाइल फटका बघाच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 shafali verma perfect scoop shot

VIDEO : छोरिया छोरों से कम हैं के! शफालीचा एबी स्टाइल फटका बघाच

आयसीसी महिला वर्ल्ड कप 2022 स्पर्धेतील साखळी फेरीतील शेवटचा सामना भारत आणि दक्षिण आफ्रिका महिला संघात खेळवण्यात येत आहे. ख्राइस्टचर्चच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात भारतीय बॅटरनी संघाला दमदार सुरुवात करुन दिली. त्यानंतर मिताली हरमनप्रीत कौरच्या दिमाखदार खेळीच्या जारोवर भारतीय महिला संघाने आफ्रिकेसमोर 275 धावांचे तगडे आव्हान उभे केले. (womens world cup 2022 shafali verma perfect scoop shot ab de villiers Style watch video )

भारतीय सलामीच्या बॅटर स्‍मृती मानधना आणि शफाली वर्मा या दोघींनी पहिल्या विकेटसाठी 91 धावांची मोलाची भागीदारी केली. या दोघींनी 2017 च्या वर्ल्ड कपमध्ये दीप्ती शर्मा आणि पूनम राउत यांनी केलेल्या 83 धावांच्या भागीदारीचा विक्रम यावेळी मोडीत निघाला. भारतीय संघाची दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सलामी जोडीनं नव्या विक्रमी भागीदारीची नोंद केली.

हेही वाचा: वर्ल्ड कप स्पर्धेत स्मृती मानधनानं सर केला 500 धावांचा टप्पा

दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या लढतीत शफाली वर्माने आक्रमक अंदाजात फलंदाजी केली. 18 वर्षीय बॅटरने चौफेर फटकेबाजी करताना काही खास आणि अविस्मरणीय शॉट्स खेळल्याचे पाहायला मिळाले. यातील तिचा स्कूप शॉट डोळ्याचे पारणे फेडणारा असाच होता. तिने खेळलेला हा फटका दक्षिण आफ्रिका पुरुष संघातील स्टार खेळाडू एबी डिव्हिलियर्सच्या खेळीची आठवण करुन देणारा होता. भारतीय डावातील तिसऱ्या षटकात शफालीनं आफ्रिकेची अनुभवी गोलंदाज शबनम इस्माइलच्या चेंडूवर अप्रतिम फटका खेळल्याचे पाहायला मिळाले.

हेही वाचा: मितालीचा वर्ल्ड रेकॉर्ड; 39 व्या वर्षी तारुण्यातला तोरा

अर्धशतकी खेळीनंतर शफाली धावबाद होऊन परतली. तिने भारतीय संघासाठी 53 धावांचे बहुमूल्य योगदान दिले. त्यानंतर स्मृती मानधना हिने 84 चेंडूत संयमी 71 धावांची खेळी करत डावाला आकार दिला. कर्णधार याशिवाय हरमनप्रीत कौरचे अर्धशतक 2 धावांनी हुकले.

Web Title: Womens World Cup 2022 Shafali Verma Perfect Scoop Shot Ab De Villiers Style Watch Video

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..