Olympic Paris 2024 : पॅरिस ऑलिम्पिकपूर्वी मोठी घोषणा! सुवर्णपदक जिंकणारे खेळाडू होणार मालामाल

यंदाच्या पॅरिस ऑलिंपिकमध्ये ॲथलेटिक्समध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या ॲथलिट्ला रोख पुरस्कार देऊन सन्मानित करण्याचा ऐतिहासिक निर्णय जागतिक ॲथलेटिक्स संघटनेने घेतला आहे.
Olympic Paris 2024
Olympic Paris 2024sakal

Olympic Paris 2024 : यंदाच्या पॅरिस ऑलिंपिकमध्ये ॲथलेटिक्समध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या ॲथलिट्ला रोख पुरस्कार देऊन सन्मानित करण्याचा ऐतिहासिक निर्णय जागतिक ॲथलेटिक्स संघटनेने घेतला आहे. बुधवारी या निर्णयाची घोषणा करण्यात आली. जागतिक ॲथलेटिक्स संघटना असा निर्णय घेणारी पहिली आंतरराष्ट्रीय क्रीडा संघटना ठरली आहे.

Olympic Paris 2024
Rohit Sharma IPL 2025 : रोहित शर्मा सोडणार मुंबई इंडियन्स? LSG मध्ये होणार सामील, कोचचं मोठं वक्तव्य

प्रत्येक चार वर्षांनी आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीकडून मिळणाऱ्या वाट्यातून तब्बल २.४ लाख अमेरिकन डॉलर्सचे एकूण पुरस्कार देण्यात येणार आहे. पॅरिसमध्ये ॲथलेटिक्स या क्रीडा प्रकारात एकूण ४८ इव्हेंट होणार असून त्यातील प्रत्येक सुवर्णपदक विजेत्याला अनुक्रमे ५० हजार अमेरिकन डॉलर्सचा रोख पुरस्कार मिळेल. भविष्यात यात वाढ होऊ शकते, तसेच २०२८च्या लॉस एंजल्स ऑलिंपिकमध्ये रौप्य व ब्राँझपदक विजेत्यांनाही रोख पुरस्कार देण्यासाठी जागतिक ॲथलेटिक्स संघटना कटिबद्ध आहे.

Olympic Paris 2024
Pakistan Cricket : 'RIP पाकिस्तान क्रिकेट...' मोहम्मद हाफीजच्या पोस्टने क्रिकेट विश्वात उडाली खळबळ

पुरस्काराची राशी देताना जागतिक ॲथलेटिक्स संघटनेची मान्यताप्राप्त प्रक्रिया आहे ती ॲथलिट्ला पूर्ण करावी लागेल. त्याचप्रमाणे सुवर्णपदक विजेत्याला डोपिंगच्या प्रक्रियेत त्याचा सहभाग असणे आवश्यक आहे आणि त्यातून निर्दोष बाहेर येणेही आवश्यक आहे. वैयक्तिक विजेत्याप्रमाणे रिले संघालाही ५० हजार अमेरिकन डॉलर्स ही सारखीच रक्कम मिळेल. ही रक्कम रिले संघातील सर्व सदस्यांमध्ये समान वितरित होईल. २०२८च्या पुरस्काराची रचना व पद्धत लवकरच घोषित करण्यात येईल.

Olympic Paris 2024
IPL 2025 Auction : बलाढ्य संघ तगडाच राहणार... IPL मध्ये पुन्हा येणार नवा नियम! टीममध्ये ठेवता येणार इतके खेळाडू?

आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीकडून जागतिक ॲथलेटिक्स संघटनेला ऑलिंपिकसाठी मिळणारा पैसा पुन्हा खेळात आणण्याची ही एक प्रक्रिया असून यास २०१५ पासून सुरुवात झाली. सदस्य महासंघाला ऑलिंपिक डिव्हिडंड देण्याने यास आम्ही सुरुवात केली. ऑलिंपिक खेळात काही प्रमाणात महसूल गोळा करण्यासाठी योगदान देणाऱ्या ॲथलिट्सला हा पैसा मिळावा, हे महत्त्वाचे आहे.

-सॅबेस्टियन को, अध्यक्ष, जागतिक ॲथलेटिक्स संघटना

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com