Rohit Sharma IPL 2025 : रोहित शर्मा सोडणार मुंबई इंडियन्स? LSG मध्ये होणार सामील, कोचचं मोठं वक्तव्य

Rohit Sharma IPL 2025 : आपल्या कर्णधारपदाखाली मुंबई इंडियन्सला पाच वेळा आयपीएल विजेतेपद मिळवून देणारा स्टार फलंदाज रोहित शर्मा लीगच्या 17 व्या हंगामात खेळाडू म्हणून खेळत आहे.
Rohit Sharma IPL 2025
Rohit Sharma IPL 2025esakal

Rohit Sharma IPL 2025 : आपल्या कर्णधारपदाखाली मुंबई इंडियन्सला पाच वेळा आयपीएल विजेतेपद मिळवून देणारा स्टार फलंदाज रोहित शर्मा लीगच्या 17 व्या हंगामात खेळाडू म्हणून खेळत आहे. आयपीएल 2024 सुरू होण्यापूर्वीच मुंबई इंडियन्सच्या फ्रँचायझीने रोहित शर्माला कर्णधारपदावरून काढून टाकले आणि संघाची कमान हार्दिक पांड्याकडे सोपवली.

Rohit Sharma IPL 2025
IPL 2025 Auction : बलाढ्य संघ तगडाच राहणार... IPL मध्ये पुन्हा येणार नवा नियम! टीममध्ये ठेवता येणार इतके खेळाडू?

हार्दिकच्या नेतृत्वाखाली एमआयने सलग तीन पराभवानंतर पहिला विजय मिळवला. रोहितला पुन्हा कर्णधार बनवण्याची चाहत्यांची मागणी आहे. दरम्यान, आयपीएल 2024 मधील सलग तीन पराभवानंतर रोहित पुढील हंगामात संघ सोडू शकतो आणि आयपीएल 2025 च्या मेगा लिलावात प्रवेश करेल असे बोलले जात आहे.

जर रोहित आयपीएल 2025 च्या मेगा लिलावात सहभागी झाला तर लखनौ सुपर जायंट्स (LSG) त्याच्यासाठी बोली लावेल का? लखनौ सुपर जायंट्सचे मुख्य प्रशिक्षक जस्टिन लँगर यांना याबाबत प्रश्न विचारला असता तो आश्चर्यचकित झाला. आणि यांनी रोहित एलएसजीमध्ये येण्याच्या शक्यतेवर मोठे विधान केले आहे.

Rohit Sharma IPL 2025
IPL 2025 Auction : बलाढ्य संघ तगडाच राहणार... IPL मध्ये पुन्हा येणार नवा नियम! टीममध्ये ठेवता येणार इतके खेळाडू?

व्हायरल व्हिडिओमध्ये, लखनऊच्या एका सदस्याने लँगरला विचारले की, आता मेगा लिलाव होणार आहे आणि प्रत्येकजण उपलब्ध असेल, तर तुम्हाला कोणता खेळाडू निवडायला आवडेल? याला प्रत्युत्तर देताना लँगर म्हणाला, जर मी एक खेळाडू घेऊ शकतो तर... तुम्हाला काय वाटते? याला प्रत्युत्तर म्हणून संघातील सदस्याने रोहितचे नाव घेतले. यावर लँगर हसला आणि म्हणाला, रोहित शर्मा? आम्ही त्याला मुंबई इंडियन्सकडून येथे आणू. पण तुम्ही निगोशिएटर झालात तर बरे होईल.

Rohit Sharma IPL 2025
Jack Alabaster : क्रिकेट विश्वात पसरली शोककळा! माजी दिग्गज क्रिकेटपटूचे निधन

आयपीएल 2024 मध्ये माजी कर्णधार रोहित फॉर्ममध्ये आला आहे. त्याने रविवारी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध 27 चेंडूत 49 धावांची शानदार खेळी खेळली. यादरम्यान रोहितने इशान किशनसोबत पहिल्या विकेटसाठी 80 धावांची भागीदारीही केली. या सामन्यात रोमारियो शेफर्डने शेवटच्या षटकांमध्ये केवळ 10 चेंडूत 39 धावा केल्या.

या सामन्यात मुंबईने दिल्लीचा पराभव करत या मोसमातील पहिला विजय नोंदवला. त्याचवेळी दिल्लीला पाच सामन्यांत चौथ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. एमआय संघ चार सामन्यांत केवळ विजय मिळवून गुणतालिकेत आठव्या स्थानावर आहे. मुंबई इंडियन्सला त्यांचा पुढचा सामना 11 एप्रिलला वानखेडे स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू (RCB) विरुद्ध खेळायचा आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com