Neeraj Chopra : विश्वविजेत्या नीरज चोप्राला ‘वर्ल्ड ॲथलिट ऑफ दी इअर’ पुरस्कारासाठी नामांकन; यादी जाहीर

भारतीय खेळाडूला प्रथमच असे नामांकन मिळाले आहे.
World champion Neeraj Chopra nominated for World Athlete of the Year award list announced
World champion Neeraj Chopra nominated for World Athlete of the Year award list announcedesakal

लंडन : ऑलिंपिक व विश्वविजेता भालाफेकपटू नीरज चोप्राला यंदाच्या ‘वर्ल्ड ॲथलिट ऑफ दी इअर’ साठी नामांकन मिळाले आहे. भारतीय खेळाडूला प्रथमच असे नामांकन मिळाले आहे. नीरजसोबत अन्य दहा जणांनाही नामांकन मिळाले असून ११ डिसेंबरला जागतिक ॲथलेटिक्स विजेत्याच्या नावाची घोषणा करणार आहे.

ॲथलेटिक्समधील आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांच्या चमूने या ११ जणांची निवड केली आहे. यासाठी मतदान होणार असून तीन पद्धतीने केलेल्या मतदानाच्या आधारावर विजेत्याची निवड होईल. जागतिक ॲथलेटिक्स परिषद आणि जागतिक ॲथलेटिक्स फॅमिली आपले मत ई-मेलद्वारे देतील.

चाहते आपले मत जागतिक ॲथलेटिक्सच्या सोशल मीडियावर नोंदवतील. जागतिक ॲथलेटिक्स परिषदेच्या सदस्यांच्या मताला ५० टक्के वजन देण्यात येणार असून इतर मताला प्रत्येकी २५ टक्के वजन देण्यात येईल. २८ ऑक्टोबरला मतदान बंद होईल. ११ पैकी अंतिम पाच विजेत्यांची नावे १३ व १४ नोव्हेंबरला जाहीर करण्यात येतील.

World champion Neeraj Chopra nominated for World Athlete of the Year award list announced
Neeraj Chopra : नीरजनं दुसऱ्या खेळाडूंचा विचार केला अन्... अन्याय झाला तरी दाखवली खिलाडूवृत्ती!

इतर नामांकने ः रायन क्रुझर (गोळाफेक-अमेरिका), मोंडो डुप्लांतिस (पोल व्हॉल्ट-स्वीडन), सौफीन बकाली (३००० मीटर स्टीपलचेस - मोरोक्को), जेकब इंगेब्रिग्स्टन (१५००, ५०००- नॉर्वे), केल्विन किप्टुम (मॅरेथॉन-केनिया), पियर्स लेपागे (डेकॅथलॉन - कॅनडा), नोह लेलेस (१००, २००-अमेरिका), अल्वारो मार्टिन (३५ व २० कि.मी. चालणे- स्पेन), मिल्टिडिअस टेंटोग्लू (लांब उडी - ग्रीस), कार्स्टन वारहोम (४०० हर्डल्स - नॉर्वे).

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com