Neeraj Chopra : गोल्ड अन् मन दोन्ही जिंकलास! नीरज चोप्राचा अरशद नदीमसोबतच्या व्हिडिओची कमाल, पाकिस्तानकडूनही कौतुक

world championship final 2023 neeraj chopra won million of hearts called pakistan arshad nadeem
world championship final 2023 neeraj chopra won million of hearts called pakistan arshad nadeem

नीरज चोप्राने टोकियो ऑलिंपिकमध्ये भालाफेकीत सुवर्णपदक जिंकल्यानंतर सात ऑगस्ट हा दिवस ‘राष्ट्रीय भाला दिवस’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय भारतीय ॲथलेटिक्स महासंघाने घेतला होता. आता जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धेतील नीरजच्या सुवर्णपदकमुळे २७ ऑगस्ट हा दिवस आता वेगळ्या अर्थाने साजरा करावा लागेल. किशोर जेना व डीपी मनू यांनी भालाफेकीत अनुक्रमे पाचवा व सहावा क्रमांक मिळवून भारतीयांच्या आनंदात आणखी भर टाकली. ही दोन पदके म्हणजे क्रीडा प्रेमींना राष्ट्रीय क्रीडा दिनाची भेट होय.

world championship final 2023 neeraj chopra won million of hearts called pakistan arshad nadeem
Neeraj Chopra : नीरज चोप्राच्या 'सुवर्ण' इतिहासात आणखी एक अध्याय, पाकिस्तानसह संपूर्ण जगाला हरवून बनला 'वर्ल्ड चॅम्पियन'

दरम्यान भारतीय गोल्डन बॉय नीरज चोप्राने जागतिक चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकून लाखो चाहत्यांची मने जिंकली. त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो केवळ भारताच्याच नाही तर पाकिस्तानच्या चाहत्यांनाही पसंत केला आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये नीरज चोप्रा सामना संपल्यानंतर पाकिस्तानी अॅथलीट अर्शद नदीमला फोटो क्लिकसाठी बोलवत आहे.

व्हिडिओमध्ये नीरज चोप्रा चेक अॅथलीट याकूब वालेशसोबत तिरंग्यासह फोटो क्लिक करताना दिसत आहे. दोन्ही खेळाडूंकडे आपापल्या देशाचा ध्वज होता. त्यानंतर नीरजची नजर अर्शदकडे गेली आणि त्याने पाकिस्तानी खेळाडूला फोटो क्लिक करण्यासाठी बोलावले. घाईघाईत अर्शदला यावेळी पाकिस्तानचा झेंडा आणता आला नाही, मात्र त्याने नीरजसोबत क्लिक केलेला फोटो मिळाला. तुम्हीही पाहू शकता हा अप्रतिम व्हिडिओ-

प्राथमिक फेरीतील कामगिरीमुळे नीरज हा सुवर्णपदकाच्या शर्यतीत अव्वल स्थानावर होता. मात्र, अंतिम फेरीतील त्याची सुरुवात आश्वासक नव्हती. पहिल्या फेकीत त्याचा फाऊल झाला. त्याचवेळी मनूने ७८.४४ मीटर अंतरावर फेक करून चुणूक दाखवली. त्यातच ऑलिंपिक रौप्यविजेत्या झेकच्या जाकूब वालेजने दुसऱ्या प्रयत्नात ८४.१८ मीटर अशी फेक करून नीरजवरील दबाव वाढविला होता. मात्र, नीरजने दुसऱ्या प्रयत्नात ८८.१७ मीटरवर फेक केली आणि दबाव झुगारला. हळूहळू प्रत्येक स्पर्धक कामगिरीत सुधारणा करीत असल्याने स्पर्धा चुरशीची होऊ लागली होती. राष्ट्रकुल विजेत्या पाकिस्तानच्या अर्शद नदीमने तिसऱ्या प्रयत्नात ८७.८२ मीटर अशी फेक केल्याने चुरस आणखी वाढली.

तीन प्रयत्नानंतर आठ खेळाडूंची निवड करण्यात आली, त्यावेळी त्यात तीन भारतीय व एक पाकिस्तानी स्पर्धक होता. त्यापैकी किशोर जेनाने पाचव्या प्रयत्नात ८४.७७ मीटर अशी वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी करीत चक्क चौथ्या स्थानावर झेप घेतली. मनूला मात्र आपल्या कामगिरीत आणखी सुधारणा करता आली नाही. मनूला ८४.१४ मीटर कामगिरीसह सहावे स्थान मिळाले. आजच्या सुवर्णपदकामुळे नीरज जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा पहिला आशियाई खेळाडू ठरला. तसेच, दोन पदके जिंकणाराही पहिला भारतीय खेळाडू ठरला. २००३ च्या स्पर्धेत अंजू जॉर्जने ब्राँझपदक जिंकल्यानंतर नीरजने गेल्यावर्षी रौप्यपदक जिंकले होते.

नीरजची अंतिम फेरीतील कामगिरी

  • x (फाऊल), ८८.१७, ८६.३२, ८४.६४, ८७.७३, ८३.९८ मीटर

  • अंतिम निकाल (भालाफेक) ः नीरज चोप्रा (भारत- ८८.१७ मीटर),

  • अर्शद नदीम (पाकिस्तान ८७.१२), जाकूब वालेज (झेक- ८६.६७ मीटर)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com