जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत बरोबरींची कोंडी कायम

world chess championship 2018
world chess championship 2018

जागतिक बुद्धिबळ स्पर्धा, लंडन २०१८

नॉर्वेचा तीन वेळा जगज्जेता ठरलेला मॅग्नस कार्लसन आणि अमेरिकेचा आव्हानवीर फॅबियानो कारुआना यांच्यातील जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेतील सहावा डावही बरोबरीत सुटला. पहिला डाव तब्बल ११५ चालीनंतर बरोबरीत सुटला होता. त्याप्रमाणेच प्रदीर्घ आणि रंगलेला सहावा डाव ८० चालीनंतर बरोबरीत सुटला. सलग सहावा डाव वेळ बरोबरीत सुटल्या मुळे कार्लसन आणि कारुआना या दोघांचेही प्रत्येकी ३ गुण झाले आहेत.

डाव सहावा - जागतिक स्पर्धेत पेट्रॉफचा प्रथमच वापर
सहाव्या डावात कार्लसनने राजा समोरील प्यादे दोन घर पुढे टाकून डावास सुरुवात केली. कारुआना ने त्यास भरवश्याच्या पेट्रॉफ पद्धतीने प्रत्युत्तर दिले. मेक्सिको २००७ वगळता जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत पेट्रॉफ बचाव पद्धतीचा प्रथमच वापर होताना दिसून आला.

या डावात लवकरच म्हणजे आठव्या चालीवरच वजिरा-वजिरी झाली. तसेच उभयतांमध्ये १५व्या चाली होताच डाव बरोबरीत सुटायची चिन्ह दिसू लागली, ज्यामुळे प्रेक्षागृह आणि वार्ताहरकक्षात काहीशी उदासीनता प्रसारली.

कार्लसन ने दिला उंटाचा बळी
डावाच्या मध्य पर्वात उत्तम तयारीचा नमुना सादर करीत कारुआना ने कार्लसनवर दबाव टाकण्यात यश मिळवले. मध्य पर्व ते अंतिम पर्वाकडे वाटचाल करणाऱ्या या डावात पदोपदी उद्भवणाऱ्या समस्यांचे समाधान शोधताना कार्लसन ने तीन प्याद्यांच्या बदल्यात आपला पांढऱ्या घरातील उंट देऊ केला.

कार्लसन ने रचली तट बंदी
कार्लसन ला डाव वाचवण्यासाठी तट बंदी रचणे आवश्यक होते. ही तट बंदी रचण्यात कार्लसन ला काहीसं यश देखील मिळालं. पण त्यानंतर कार्लसन कडून एक चूक झाली. कार्लसनच्या चुकीनंतर, म्हणायला गणित तसं सोपं होतं. जिंकण्यासाठी कारुआना ला कार्लसनची  तट बंदी भेदण आवश्यक होतं. पण कारुआना ला यंत्रागणिक चाली शोधण्यात अपयश आलं. या डावात काळ्या मोहऱ्यांनी खेळणाऱ्या कारुआना ने यंत्रागणिक चाली शोधण्यात यश मिळवले असते तर कार्लसनची हार निश्चित होती. पण नियतीली हे मान्य नव्हते. ८० चालीनंतर रंगलेली ही नाट्यपूर्ण प्रदीर्घ लढत बरोबरीत सुटली. कारुआनाच्या चेहऱ्यावर काहीसा हताश भाव दिसून आला तर मॅग्नस कार्लसन ने (दुसऱ्या डावा प्रमाणे) पुन्हा एकदा सुटकेचा निश्वास सोडला.

पांढऱ्या मोहऱ्यांनी खेळणारे कार्लसन आणि कारुआना निष्प्रभ
या स्पर्धेत पहिल्या सहा डावांमध्ये पांढऱ्या मोहऱ्यांनी खेळणाऱ्या कार्लसन किंवा कारुआना यांना कुठला ही फायदा उठविता आलेला नाही, हे विशेष. काळ्या मोहऱ्यांनी खेळणाऱ्या कार्लसनने ११५ चालीपर्यंत झालेल्या पहिल्या डावात विजयाची संधी सोडली, असे तज्ज्ञांचे मत होते. तसेच कार्लसनसाठी (काळ्या मोहऱ्यांनी खेळणाऱ्या) कारुआनाने दुसऱ्या डावात ४९ चालींनंतर दिलेला बरोबरीचा प्रस्ताव सुखावणारा होता. तज्ज्ञांच्या मते, करुआनाने अजून लढत लांबवली असती, तर कार्लसन दडपणाखाली कोलमडला असता.

कार्लसन आणि कारुआना यांच्या क्षमतेचा कस
जागतिक बुद्धिबळ विजेतेपदाच्या लढतीतील दुसऱ्या डावा प्रमाणे सहाव्या डावात मॅग्नस कार्लसनने कडव्या संघर्षानंतर फॅबिआनो कारुआना याच्या विरुद्ध हार टाळण्यात यश मिळविले. लढतीतील पहिल्या पडावापूर्वी दोघांच्याही क्षमतेचा चांगलाच कस निदर्शनास येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com