

मुंबई, ता. १२ : भारताच्या १८ वर्षीय डी. गुकेशने गुरुवारी जागतिक बुद्धिबळमध्ये इतिहास रचला. विश्वनाथन आनंद यांच्यानंतर विश्व अजिंक्यपद लढत जिंकणारा तो भारताचा दुसरा बुद्धिबळपटू ठरला. आता त्याचे पुढील लक्ष्य जागतिक क्रमवारी पहिल्या स्थानावर झेप घेण्याचे असणार आहे.