

World Chess Championship 2026
ESakal
अनुपमा गोखले
बुद्धिबळ विश्वविजेतेपदाच्या स्वित्झर्लंड येथे सुरू असलेल्या लढईतील विद्यमान गुकेश आणि आव्हानवीर जावोखिर सिंदारॉव्ह यांच्यातील दुसरा डाव केवळ २० खेळींच्या नंतर बरोबरीत सुटला. १४ डावांच्या लढतीची अजून जेमतेम सुरुवातच झाली आहे. दोन्ही खेळाडूंना प्रत्येकी एक-एक डाव पांढरी मोहरी घेऊन खेळायची संधी मिळाली आहे.