World Cup 2019 : राखीव जडेजाला आता खेळण्याची संधी; श्रीलंकेविरुद्ध भारताची प्रथम गोलंदाजी

वृत्तसंस्था
शनिवार, 6 जुलै 2019

श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघात अखेर रवींद्र जडेजाला स्थान देण्यात आले. महंमद शमीच्या ऐवजी त्याला संघात स्थान देण्यात आले आहे. तसेच युझवेंद्र चहलच्याऐवजी कुलदीप यादवला स्थान देण्यात आले आहे.

वर्ल्ड कप 2019 : लीड्स : भारतीय संघाने यापूर्वीच उपांत्यफेरीत प्रवेश केल्यामुळे श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यातील निकालावर भारतीय संघाचे गुणतक्यातील स्थान ठरणार आहे. आजच्या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून फलंदाजी घेतली. 

या सामन्यात भारतीय संघाने विजय मिळविल्यास ते गुणतक्त्यात अव्वल स्थान मिळवतील. ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका या सामन्याच्या निकाल जर आफ्रिकेच्या बाजूने लागला, तर भारतीय संघाचे अव्वल स्थान कायम राहिल आणि भारताला उपांत्य फेरीत न्यूझीलंडचा सामना करावा लागेल.

श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघात अखेर रवींद्र जडेजाला स्थान देण्यात आले. महंमद शमीच्या ऐवजी त्याला संघात स्थान देण्यात आले आहे. तसेच युझवेंद्र चहलच्याऐवजी कुलदीप यादवला स्थान देण्यात आले आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: World Cup 2019 : Jadeja is in playing XI Indias first bowling attack against Sri Lanka