World Cup 2019 : त्या आजींना दिलेलं वचन कोहलीने पाळलं अन्...

वृत्तसंस्था
Thursday, 4 July 2019

''मी तुम्हाला पुढची सर्व तिकीटं देईन,'' असं आश्वासन कोहलीनं दिलं होतं.

वर्ल्ड कप 2019 : भारत आणि बांगलादेश यांच्यात झालेल्या सामन्यात सर्वाधिक लोकप्रिय झाल्या त्या 87 वर्षीय लारुलता पटेल या आजी. भारताने तो सामना जिंकावा, म्हणून त्या एवढे वय असूनही स्टेडियममध्ये येऊन संघाला प्रोत्साहन देत होत्या. सामना झाल्यानंतर कर्णधार विराट कोहली त्यांना भेटायला गेला होता. त्यावेळी त्याने त्यांना एक वचन दिले आणि ते दोन दिवसांत पाळलेही. 

कोहलीने त्यांना भेटायला गेल्यावर चारुलता यांना पुढच्या सामन्यांमध्येही आम्ही तुम्हाला प्रेक्षक गॅलरीत पाहू इच्छितो, अशी इच्छा व्यक्त केली होती. मात्र, त्यांच्याकडे तिकट नसल्याने त्या येऊ शकणार नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यावर ''मी तुम्हाला पुढची सर्व तिकीटं देईन,'' असं आश्वासन कोहलीनं दिलं होतं. 

कोहलीने चारुलता यांना केवळ आश्वासन दिल नाही, तर अवघ्या काही तासात पाळलंही. ''कोहलीने आमच्यासाठी भारताच्या सर्व सामन्यांची तिकीटं पाठवली आहेत. 6 जुलैला लीड्समध्ये होणारा श्रीलंकेविरुद्धचा सामना, दोन्ही सेमीफायनल आणि अंतिम सामन्याचं तिकीट आम्हाला मिळालं आहे,'' अशी माहिती चारुलता यांच्या नातीने दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: World Cup 2019 The promise given to 87 years old fan were followed by Captain Kohli