Axar Patel : भारताला मोठा धक्का! अक्षर पटेल तिसऱ्या ODI बरोबरच वर्ल्डकपमधून बाहेर? कोणाला मिळणार संधी

Axar Patel
Axar Patelsakal
Updated on

Axar Patel : भारतीय संघ सध्या वर्ल्डकप 2023 आधी ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळत आहे. या मालिकेतील पहिले दोन सामने जिंकून भारतीय संघाने मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. तिसरा आणि अंतिम सामना 27 सप्टेंबर रोजी होणार आहे.

दरम्यान, लेफ्ट आर्म स्पिनर आणि अष्टपैलू अक्षर पटेलबद्दल मोठी बातमी येत आहे. अक्षर अद्याप दुखापतीतून पूर्णपणे सावरला नसून तो राजकोट येथे होणाऱ्या तिसऱ्या वनडेतूनही बाहेर पडला आहे. आशिया कप 2023 दरम्यान अक्षरला दुखापत झाली होती.

सध्या तो एनसीएमध्ये आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऑफस्पिनर आर अश्विनला संधी देण्यात आली आहे. त्याने आतापर्यंत चांगली कामगिरी केली असून वर्ल्डकपसाठी संघात स्थान मिळविण्याच्या शर्यतीतही आहे.

Axar Patel
Team India : अश्विनच्या 'गुगली'त अडकले रोहित शर्मा अन् राहुल द्रविड, वर्ल्डकपमध्ये कोणाचा पत्ता होणार कट?

क्रिकबजच्या वृत्तानुसार, अक्षर पटेलच्या अनुपस्थितीने आर अश्विनसाठी दरवाजे उघडले आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या 2 वनडेत त्याने 4 विकेट्स घेतल्या आहेत. अश्विनने दुसऱ्या सामन्यात 3 बळी घेतले. मात्र, वर्ल्डकपपूर्वी अक्षर तंदुरुस्त होऊ शकतो, असे सूत्रांचे म्हणणे आहे. वर्ल्डकपच्या सराव सामन्यात तो खेळताना दिसू शकतो. भारतीय संघाला 30 सप्टेंबरला गुवाहाटी येथे इंग्लंडविरुद्ध पहिल्या सराव सामना खेळायचा आहे.

Axar Patel
IND vs AUS : बुमराहनंतर शार्दुल ठाकूर अन् 'हा' दिग्गज सलामीवीर तिसऱ्या ODI सामन्यातून बाहेर, जाणून घ्या कारण?

कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, हार्दिक पांड्या आणि कुलदीप यादव यांना ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या 2 वनडेतून विश्रांती देण्यात आली आहे. सर्व वरिष्ठ खेळाडू शेवटच्या सामन्यात पुनरागमन करत आहेत.

अंतिम सामन्यासाठी घोषित करण्यात आलेल्या 17 सदस्यीय संघात आर अश्विन आणि वॉशिंग्टन सुंदर यांनाही स्थान मिळाले आहे. अक्षर पटेल बाहेर गेला तर आर अश्विन तिसऱ्या सामन्यातही खेळताना दिसू शकतो.

निवडकर्त्यांनी शुभमन गिल आणि शार्दुल ठाकूर यांना तिसऱ्या सामन्यासाठी विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही खेळाडू इंदूरहून राजकोटला जाणार नाहीत. जसप्रीत बुमराह दुसऱ्या सामन्यात खेळला नाही. तिसऱ्या सामन्यापूर्वी तो संघात सामील होऊ शकतो. निवडकर्त्यांना 27 सप्टेंबरपर्यंत वर्ल्डकपसाठी 15 सदस्यीय अंतिम संघ जाहीर करायचा आहे. याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. मंगळवारी संघ इंदूरहून राजकोटला रवाना होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com