Virat Kohli: विराट कोहली ठरला वर्ल्ड कपचा 'मॅन ऑफ द टुर्नामेंट', 'ही' कामगिरी करणारा पहिला खेळाडू

विश्वचषक स्पर्धेत ३ पुरस्कार जिंकणारा विराट कोहली हा एकमेव खेळाडू बनला आहे.
Virat Kohli
Virat Kohliesakal

Virat Kohli Man of The Tournament: नुकताच भारत आणि ऑस्ट्रेलिया या संघांमध्ये विश्वचषकाचा अंतिम सामना खेळवला गेला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतावर ६ गडी राखून विजय मिळवला. स्पर्धेत प्रत्येक संघावर एकतर्फी विजय मिळवलेल्या भारताला अंतिम सामन्यात मात्र पराभव स्विकारावा लागला. भारताचा फलंदाज विराट कोहली या स्पर्धेचा मालिकावीर ठरला. त्याने या स्पर्धेत सर्वाधिक ७६५ धावा केल्या.

विराटने या स्पर्धेत खेळलेल्या ११ डावांमध्ये ७६५ धावा केल्या. अंतिम सामन्यात त्याने ५४ धावा केल्या होत्या. मात्र, भारतीय संघ विजय होऊ शकला नसल्याने विराट कोहलीच्या डोळ्यात अश्रू तरळले होते.

आयसीसी स्पर्धांमध्ये ३ वेळा 'मॅन ऑफ द टुर्नामेंट' पुरस्कार जिंकणारा पहिला खेळाडू बनला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com