World Cup 2023 Opening Ceremony : आशा भोसले ते श्रेय घोषाल... वर्ल्डकपच्या उद्घाटन सोहळ्याला असणार लेझर शोचा झगमगाट

World Cup 2023 Opening Ceremony
World Cup 2023 Opening Ceremony esakal

World Cup 2023 Opening Ceremony : भारताता होणारा 13 वा वनडे वर्ल्डकप अवघ्या काही दिवसांवर आला आहे. स्पर्धेत सहभागी होणारे सर्व संघ भारतात दाखल झाले असून ते सध्या सराव सामने खेळत आहेत. दरम्यान, आयसीसी आणि बीसीसीआय 4 ऑक्टोबरला होणाऱ्या दैदिप्यमान उद्घाटन सोहळ्यासाठी आपली कंबर कसत आहेत.

वर्ल्डकपचा उद्घाटन सोहळा हा 4 ऑक्टोबरला जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम नरेंद्र मोदी स्टेडियमवर सायंकाळी 7 वाजता सुरू होणार आहे. बीसीसीआयने यासाठी बॉलीवूडचे स्टार कलाकार आणि गायकांना पाचारण केलं आहे. यात रणवीर सिंह, श्रेय घोषाल, अरिजीत सिंह या आघाडीच्या कलाकारांचा समावेश आहे. याचबरोबर दिग्गज आशा भोसले देखील आपल्या आवाजाने चाहत्यांचे मनोरंजन करणार आहेत.

World Cup 2023 Opening Ceremony
Asian Games 2023 : पुरूष ट्रॅप शुटिंगमध्ये भारताच्या कयनन चेनाईने जिंकले कांस्य पदक

तब्बल 12 वर्षांनी भारतात होणाऱ्या वनडे वर्ल्डकपच्या उद्घाटन सोहळ्यात बीसीसीआय कोणतीही कसर सोडणार नाहीये. या सोहळ्यात लेझर शो, फटाक्यांची आतशबाजी तर असणारच आहे याचबरोबर भारतीय सांस्कृतिक ठेव्याचे देखील दर्शन घडणार आहे. यावेळी सहभागी होणाऱ्या 10 संघांचेही कर्णधार उपस्थिती असतील. ज्या चाहत्यांनी इंग्लंड आणि न्यूझीलंड याच्याविरूद्धच्या पहिल्या सामन्याची तिकीटे खरेदी केली आहेत त्या चाहत्यांना हा सोहळा प्रत्यक्ष पाहण्याची सुवर्ण संधी मिळणार आहे.

पीटीसी पंजाबने दिलेल्या वृत्तानुसार आशी भोसले देखील या कार्यक्रमात आपल्या गायकीने चार चांद लावणार आहेत. याचबरोबर श्रेया घोषाल, अरिजीत सिंह, शंकर महादेवन देखील आपली कला सादर करणार आहे. आयसीसी अँथम साँगमध्ये दिसलेला बॉलीवूड स्टार रणवीर सिंह उद्घाटन सोहळ्यात देखील परफॉर्मन्स सादर करणार आहे. त्याच्या जोडीला तमन्ना भाटिया देखील असेल.

World Cup 2023 Opening Ceremony
Aditi Ashok : रौप्य पदक विजेत्या आदितीला इतिहास रचण्याची आहे सवय; भारतीय महिलांसाठी ठरतेय दीपस्तंभ

उद्घाटन सोहळ्यात कोण कोण असणार?

  • आशा भोसले

  • श्रेया घोषाल

  • अरिजीत सिंह

  • रणवीर सिंह

  • तमन्ना भाटिया

  • शंकर महादेवन

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com