World Cup 2023
World Cup 2023esakal

World Cup 2023 : भारताच्या आदरातिथ्याने पाकिस्तानी संघाचा सपोर्ट स्टाफ चिंतेत... पत्रकार परिषदेत शादाब काय म्हणाला?

World Cup 2023 : पाकिस्तानचा संघ वनडे वर्ल्डकप खेळण्यासाठी भारतात दाखल झाला त्यावेळी त्यांचे जंगी स्वागत झाले होते. पाकिस्तानी संघ हैदराबादमध्ये आपला पहिला सामना खेळणार आहे. पाकिस्तानी संघ हैदराबादमध्ये दाखल झाल्यापासून त्यांची उत्तम बडदास्त ठेवण्यात येत आहे. त्यामुळे पाकिस्तानी संघ जाम खूश आहे.

सोशल मीडियावर हैदराबादमध्ये पाकिस्तानी संघाच्या होणाऱ्या खातिरदारीच्या फोटो व्हायरल होत आहेत. याच विषयासंदर्भात संघाचा उपकर्णधार शादाब खानला पत्रकार परिषदेत प्रश्न विचाण्यात आला. यावेळी त्याने एक रंजक विधान केलं.

World Cup 2023
Asian Games 2023 : जबरदस्त! दिवसाची सुरूवातच डबल धमाक्याने, रोलर स्केटिंगमध्ये भारताची पाठोपाठ दोन पदके

शादाब खान पाकिस्तान संघाच्या वर्ल्डकपमधील पहिल्या पत्रकार परिषदेत म्हणाला, 'आमचं विमानतळावर जंगी स्वागत झालं. हॉटेलमध्ये देखील अनेक लोक आले होते. आमची इथं जबरदस्त खातिरदारी होत आहे. इथलं जेवण खूपच रूचकर आहे. आमचा सपोर्ट स्टाफ मात्र यामुळे चिंतेत आहे. त्यांना आम्ही जाडजूड होऊ याची चिंता लागली आहे. आशा आहे की भारतासोबत अहमदाबादमध्ये होणाऱ्या सामन्यावेळी देखील अहमदाबादमध्ये आमचे असेच स्वागत होईल.'

पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू शादाब खानने पत्रकार परिषदेवेळी बॉलीवूडचा तडका देखील लगावला. त्यावेळी त्याने पाकिस्तानी संघाच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांची देखील स्तुती केली. तो बाजीराव सिंघमचा उल्लेख करत म्हणाला की, सिंघम देखील इेथे आले आहेत. यानंतर सर्वजण हसू लागले.'

World Cup 2023
Asian Games 2023:आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंचा 'धडाका'! एकाच दिवशी जिंकली १५ पदकं,साबळे-अदितीचा ऐतिहासिक विजय

पाकिस्तानचा उपकर्णधार शादाबने रोहित शर्माची देखील स्तुती केली. तो म्हणाला की ज्यावेळी हिटमॅन त्याच्या लयीत असतो त्यावेळी त्याला रोखणे अशक्य असते. जर त्याला प्रतिस्पर्धी संघाने खेळपट्टीवर पाय रोवण्याची संधी दिली तर रोहित शर्माला रोखणे शक्य नाही.

शादाबने कुलदीप यादवचा देखील उल्लेख करत तो वर्ल्डकपमधील तो एक सर्वात खतरनाक क्रिकेटपटू असल्याचे शादाबने सांगितले.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com