World Cup India Vs Pakistan : तुम्हाला संघ पाठवायचा नाही तर... पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूनेच क्रीडा मंत्र्याला फटकारलं

World Cup India Vs Pakistan
World Cup India Vs Pakistanesakal

World Cup India Vs Pakistan : एशियन क्रिकेट काऊन्सीलने आगामी आशिया कप 2023 मधील आयोजकांमध्ये बदल केला. श्रीलंकेला देखील सह आयोजक म्हणून समाविष्ट केले. यामुळे पाकिस्तानला चांगल्याच मिरच्या झोंबल्या आहेत. त्यांना आशिया कप एकट्याने आयोजित करायचा होता. मात्र भारताने पाकिस्तानमध्ये सामने खेळण्यास नकार दिल्याने एसीसीला अर्धे सामने हे श्रीलंकेत हलवावे लागले.

World Cup India Vs Pakistan
WI vs IND 1st Test : खेळपट्टीची भारताला साथ तरी समुद्रामुळे सामन्यावर येणार बालंट; कसं असेल पाचही दिवस हवामान?

एसीसीने हायब्रीड मॉडेल स्विकारले असून आता आशिया कपचे सामने श्रीलंका आणि पाकिस्तानमध्ये होणार आहेत. मात्र ही गोष्ट पाकिस्तानचे क्रीडा मंत्री एहसान मझारी यांना पचली नाही. त्यांनी बाबर आझमच्या नेतृत्वातील पाकिस्तान संघाने भारतात वर्ल्डकप खेळण्यासाठी जाऊ नये अशी विनंती केली आहे.

मझारी यांच्या या वक्तव्याचा पाकिस्तानचा माजी खेळाडू सलमान बटने चांगलाच समाचार घेतला. तो आपल्या यू ट्यूब चॅनवर बोलताना म्हणाला की जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत तुम्ही अशी वक्तव्ये करणे टाळले पाहिजे.

World Cup India Vs Pakistan
Shafali Verma: शेफाली वर्माचा धुमाकूळ! 16 चेंडूत ठोकल्या 72 धावा

'जर हे प्रकरण विचाराधीन आहे, मग त्यांना यावर विचार करू द्या. जर त्यांनी निर्णय घेतला तर तो घोषित केला जाणे गरजेचे आहे. जर सामान्य लोकं अशा प्रकारची जर तरची भाषा करत असतील तर ठीक आहे. मात्र मंत्र्यांनी सुरू असलेली चर्चा निर्णय म्हणून घोषित करू नये. जर तुम्हाला वाटते की संघ पाठवणे योग्य नाही तर पाठवू नका.'

सलमान बट पुढे म्हणाला की, 'तुम्हाला जे हवं ते तुम्ही करा मात्र तुमचं मत आणि खासगी चर्चा या ज्यावेळी निर्णय होईल त्याचवेळी उघड करा.' पाकिस्तानचे क्रीडामंत्री मझारी यांनी सांगितले की पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे चेअरमन झाका अश्रफ यांनी आयसीसीच्या डर्बन येथील बैठकीत पाकिस्तानचे वनडे वर्ल्डकपचे सामने त्रयस्थ ठिकाणी खेळवण्याची मागणी केली होती.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com