World Cup 2023 Schedule IND vs PAK : जसं आम्ही सांगू तसं... वेळापत्रक जाहीर झालं अन् पाकिस्तानचा माज उतरला

World Cup 2023 Schedule IND vs PAK
World Cup 2023 Schedule IND vs PAK esakal
Updated on

World Cup 2023 Schedule IND vs PAK : बीसीसीआय आणि पीसीबी यांच्यात आशिया कपच्या आयोजनावरून वाद निर्माण झाला होता. भारताने पाकिस्तानमध्ये खेळण्यास स्पष्ट नकार दिल्यानंतर पीसीबीने भारतात होणाऱ्या वनडे वर्ल्डकपमध्येही न खेळण्याची धमकी दिली होती. त्यानंतर भारत पाकिस्तान यांच्यातील अहमदाबादमध्ये होणाऱ्या सामन्याचे ठिकाण बदलण्याची देखील मागणी केली.

World Cup 2023 Schedule IND vs PAK
Prithvi Shaw Controversy : पृथ्वी शॉ - सपना गिल प्रकरणी मुंबई पोलीस म्हणाले; आम्ही CCTV फुटेज पाहिले अन्...

मात्र नुकतेच जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार पाकिस्तानने गेल्या काही दिवसांपासून सामन्याची ठिकाणे बदलण्याच्या केलेली मागणी आयसीसीने धुडकावून लावल्याचे स्पष्ट झाले. पाकिस्तानचा हट्ट, आडमुठेपणा अन् माज सर्व उतरला. जाहीर झालेल्या वेळापत्रकानुसार 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबरपर्यंत 46 दिवस हा क्रिकेटचा कुंभमेळा सुरू राहणार आहे.

भारत विरूद्ध पाकिस्तान यांच्यातील हाय व्होल्टेज सामना हा 15 ऑक्टोबर रोजी होणार आहे. सुरक्षेच्या कारणास्तव या सामन्याचे ठिकाण बदलण्याची मागणी पाकिस्तानने केली होती. मात्र आयसीसीने ही मागणी धुडकाडून लावली आहे. त्यामुळे पाकिस्तानला भारताचा सामना हा नरेंद्र मोदी स्टेडियमवरच होणार आहे.

World Cup 2023 Schedule IND vs PAK
World Cup 2023 Schedule : पुणेकरांनो 'या' तारखा राखून ठेवा, मिळणार 5 वर्ल्डकप सामने पाहण्याची संधी

पाकिस्तानने त्यांचा बंगळुरूमध्ये होणारा ऑस्ट्रेलियाविरूद्धचा सामना चेन्नईत आणि चेन्नईत अफगाणिस्तानविरूद्धच्या होणारा सामना बंगळुरूत खेळवण्याची मागणी केली होती. पाकिस्तानने यासाठी खेळपट्टीचे कारण देत चेन्नईत अफगाणिस्तानला फायदा होईल अशी भिती व्यक्त केली होती.

मात्र आयसीसीने याबाबतीतही पाकिस्तानला वाटाण्याच्या अक्षता दाखवल्या. पाकिस्तानचा ऑस्ट्रेलियाविरूद्धचा सामना हा बंगळुरूमध्येच आणि अफगाणिस्तान विरूद्धचा सामना हा चेन्नईतच होणार आहे. त्यामुळे पाकिस्तानने व्यक्त केलेली भिती अफगाणिस्तान खरी ठरवणार का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com